Calangute : पुण्याच्या पर्यटकासोबत गोव्यात घडले असे काही, शेवटी मदतीला पोलिस आले धावून

पर्यटकाने मानले गोवा पोलिसांचे आभार
Calangute Beach | Goa Crime News
Calangute Beach | Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute : पोलिसांचा चांगुलपणा अनेकदा दुर्लक्षित केला जातो पण या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांमधील चांगुलपणा समोर आला आहे. (Goa Crime News)

कळंगुट पोलिसांनी चांगुलपणा तसेच प्रामाणिकपणा दाखवत पुण्यातील एका व्यक्तीला त्यांचे हरवलेले दागिने पुन्हा परत केले आहेत. आपले कर्तव्य चोखपणे बजावत दागिने परत मिळवून दिल्याबद्दल यावेळी पुण्यातील पर्यटकाने पोलीस निरीक्षक तसेच इतरांचे आभार मानले.

Calangute Beach | Goa Crime News
Bondla Wildlife Sanctuary : बोंडला प्राणी संग्रहालयाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी

अधिक माहिती अशी की, पुण्यातील नागरिक सौरव धाकटे हे आपल्या कुटुंबीयांसह कळंगुट येथे आले असता त्यांचे दागिने हरवले होते. या दागिन्यांची किंमत सुमारे ६ लाख रुपये एवढी होती. या प्रकारानंतर त्यांनी कळंगुट पोलिसांना याबाबतची तक्रार दिली होती.

या तक्रारीच्या आधारे निरीक्षक दत्तगुरु सावंत, उपनिरीक्षक राजाराम बागकर तसेच इतरांनी दागिन्यांचा शोध घेतला. दागिने आढळून आल्यावर पोलिसांनी ते मूळ मालकाच्या ताब्यात दिले. आपले कर्तव्य चोखपणे बजावत दागिने परत मिळवून दिल्याबद्दल धाकटे यांनी निरीक्षक तसेच इतरांचे आभार मानले आहे.

Goa Police Returning Stolen Ornaments
Goa Police Returning Stolen OrnamentsDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com