Goa DGP सिंग यांनी गोमन्तकीयांना केल्यात दोन महत्वाच्या सूचना, पाकिस्तानी नंबरपासून सतर्क राहण्याचे आवाहन

Goa Police: राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून धार्मिक तेढ निर्माण झाल्याच्या घटना उघडकीस आल्यात याप्रकरणी पोलिस महासंचालकांनी नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे.
DGP Jaspal Singh
DGP Jaspal SinghDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी गोमन्तकीयांना दोन महत्वाच्या सूचना वजा आवाहन केले आहे. सिंग यांनी सोशल मिडियाच्या वापराबाबत आणि एका पाकिस्तानी मोबाईल क्रमांकावरुन हे आवाहन केले आहे.

सोशल मीडिया हा माहिती, ज्ञान आणि संवादाचा प्रसार करण्यासाठी सुसंस्कृत जगाचा डिजिटल आविष्कार आहे. कृपया व्यक्ती, गट, पंथ आणि धर्म यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट टाकून या माध्यमाला 'असामाजिक' करु नका. एकमेकांचा आदर करायला शिका. कृपया कोणत्याही प्रकारची अशांतता पसरवू नका!

तसेच, जसपाल सिंग यांनी एक पाकिस्तानी मोबाईल नंबर शेअर करत त्याला प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले आहे. या नंबरच्या (+923130624785) मदतीने Whatsapp अकाऊंट तयार करण्यात आले असून, यावर डीपी म्हणून माजी सीबीआय संचालकांचा फोटो वापरण्यात आला आहे.

या क्रमांकावरुन कोणत्याही प्रकारचा संदेश किंवा फोन आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन जसपाल सिंग यांनी केले आहे.

DGP Jaspal Singh
Goa Fishing Ban: 31 मेनंतर परतणारे ट्रॉलर्स रडारवर, मत्स्योद्योगमंत्री हळर्णकरांचा कारवाईचा इशारा

गोव्यात गेल्या दोन आठवड्यात धार्मिक प्रकरणावरुन वाद होत आहे. याप्रकरणी श्रेया धारगळकर आणि नमिता फातर्पेकर या अटकेत आहेत. फातर्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्ळकरीण आणि लईराईच्या धोंडप्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्या अटकेत आहेत.

तर, दोनच दिवसांपूर्वी अभिषेक बॅनर्जी नावाच्या व्यक्तीने फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी कॅथलिक समाजाने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com