Goa Fishing Ban: 31 मेनंतर परतणारे ट्रॉलर्स रडारवर, मत्स्योद्योगमंत्री हळर्णकरांचा कारवाईचा इशारा

Goa Fishing Ban: यांत्रिकी बोटींसाठीचा मासेमारी बंदीकाळ 01 जून ते 31 जुलै असा दोन महिन्यांचा असतो.
Trawler |Goa News
Trawler |Goa News Dainik Gomantak

Goa Fishing Ban

मासेमारी बंदीचा काळ सुरू होण्यापूर्वी जे ट्रॉलर्स समुद्रात मासेमारीसाठी गेले आहेत व त्यांनी ३१ मेनंतर परतणार असल्याची कल्पना दिलेली नाही, अशा सर्व ट्रॉलर्सविरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.

साठ दिवसांच्या मासेमारी बंदी काळात खात्याची गस्तीनौका देखरेख ठेवणार आहे व यांत्रिकी बोटी समुद्रात मासेमारी करताना आढळून आल्यास त्या जप्त केल्या जातील, असे हळर्णकर यांनी स्पष्ट केले आहे.

पावसाळा सुरू झाला की मत्स्यपैदासीला सुरूवात होते. त्यामुळे गोव्यात 01 जूनपासून 31 जुलैपर्यंत मासेमारीस बंदी घालण्यात येते. सरकारकडून तशी अधिसूचनाही काढली जाते. सुमारे 2,870 यांत्रिकी बोटी गोव्यात आहेत तर यंत्रमुक्त होड्या 313 आहेत.

ट्रॉलर्सवर काम करणारे बहुतांश कामगार हे परप्रांतीय विशेषतः दक्षिण राज्यांमधील असल्याने ते या दोन महिन्यांच्या काळात मासेमारी बंदी असल्याने आपापल्या घरी परतात व ऑगस्टमध्ये पुन्हा गोव्यात येतात.

Trawler |Goa News
Goa Heritage Festival 2024: हेरिटेज फेस्टिव्हल! गोव्याच्या परंपरेशी समरस करणारा समृद्ध अनुभव Videos

मासेमारी जेटींवर आवराआवर सुरु

सध्या मासेमारी जेटींवर आवराआवर सुरू झालेली आहे. ट्रॉलर्सवरील जाळी वाहनांत भरून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम चालू आहे. तसेच ट्रालर्स नांगरून ठेवण्याबरोबरच होड्या, जाळी व अन्य साहित्य झाकून ठेवण्याच्या कामाने गती घेतली आहे.

पावसाळा आता तोंडावर येऊन ठेपला आहे. मामलेदारांनी मच्छीमारी जेटींची प्रवेशद्वारे तसेच तेथील डिझेल पंपांना सील ठोकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

31 मेनंतर ट्रॉलर्समालकांना मच्छीमारी जेटीचा वापर व्यवसायासाठी करता येणार नाही, अशी माहिती मच्छीमारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com