Goa Crime News
Goa CrimeDainik Gomantak

Saligao Murder Case: भाड्याच्या खोलीत दोघांचा खून, संशयित रेल्वेने पसार झाल्याची शक्यता; पोलिसांची पथके रवाना

Goa Murder Case: मुड्डोवाडा येथील भरवस्तीमधील एका घरातील भाड्याच्या खोलीत रिचर्ड डिमेलो व अभिषेक गुप्ता या दोघांचे मृतदेह गुरुवारी दुपारी रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते.
Published on

म्हापसा: मुड्डोवाडो, साळगाव येथील ६५ वर्षीय रिचर्ड डिमेलो यांच्यासह इंदूर येथील (मध्यप्रदेश) अभिषेक गुप्ता या दोघांचा गळा चिरून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके मुंबई तसेच इतरत्र पोहचली आहेत.

थिवी रेल्वे स्थानकाबाहेर संशयित हा दुचाकी सोडून पळून गेला होता, ती गाडी शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेत पंचनामा केला. या दुहेरी हत्याकांडाची उकल फरार खुनी हाती लागल्यानंतर होणार असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

मुड्डोवाडा येथील भरवस्तीमधील एका घरातील भाड्याच्या खोलीत रिचर्ड डिमेलो व अभिषेक गुप्ता या दोघांचे मृतदेह गुरुवारी दुपारी रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते.

Goa Crime News
Saligao Murder: एकाच खोलीत दोघांचे मृतदेह! दुहेरी खुनाच्या घटनेने साळगाव हादरले; संशयित मुंबईकडे फरार झाल्याची शक्यता

‘वास्को-पटना’ रेल्वेने पळाला

संशयिताने खून करून घटनास्थळावरुन पळ काढला होता. जातेवेळी संशयिताने रिचर्ड यांचीच दुचाकी चोरून थिवी रेल्वेस्थानक गाठले. तिथे गुरुवारी सकाळी ८ ते ८.३०च्या सुमारास रेल्वेस्थानकाबाहेरील पार्किंग ‘अटेंडंट’ला पार्किंगचे ४० रुपये दिले व तो पुढे स्थानकात शिरला.

यावेळी संशयिताकडे एक बॅग होती, असे संबंधित पार्किंग ‘अटेंडंट’चे म्हणणे आहे. यावेळी प्लॅटफॉर्मवर वास्को-पटना ही रेल्वेगाडी लागली होती. कदाचित संशयित याच रेल्वेतून पळ काढला असावा, असा संशय आहे.

Goa Crime News
Saligao Theft: घरमालकाच्या मोबाईलवरून 'ऑनलाईन' चोरी! गोव्यातील अजब प्रकार; संशयिताच्या कर्नाटकमध्ये आवळल्या मुसक्या

पोलिसांकडून साळगाव दुहेरी खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणातील संशयिताला लवकरच अटक केली जाईल. या क्रूर घटनेमागील कारणे लवकरच उघडकीस येतील.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com