Goa : वास्‍कोत ‘डेंग्‍यू’ने वाढवला ताप!

जानेवारी ते जूनपर्यंत सापडले ६२ रुग्‍ण (Dengue) : आरोग्‍य खात्‍याकडून (Health Department) जनजागृती सुरू
Dengue patients in Goa
Dengue patients in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी : राज्यात (Goa State) मलेरियाचे रुग्ण (Malaria Patient) आणि मृत्‍यू (Death) कमी होत चालले, तरी डेंग्यूचा (Dengue) प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर तापसदृश्य (Fever) रुग्णांना डेंग्यू (Dengue) आणि मलेरियावर (Malaria) चाचणी (Test) करणेसुद्धा सक्तीचे (Compulsion) केले आहे. वास्कोत (Vasco) नवेवाडे आणि वाडे भागात जास्त रुग्ण सापडत असल्याने या ठिकाणी गावपातळीवर डेंग्‍यूबाबत जनजागृती (Awareness) करण्यासाठी आरोग्य खात्यातर्फे (Health Department) एक व्‍यक्ती कार्यरत असल्‍याची माहिती व्हेक्टर बॉर्न कंट्रोल अधिकारी डॉक्टर कल्पना महात्मे यांनी दिली.

Dengue patients in Goa
औषधी उत्पादनांसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयोगशाळा

डॉ. महात्मे म्हणाल्या की, जानेवारी ते जून २०२१ पर्यंत वास्कोत एकूण ६२ सापडले. त्‍यापैकी जून महिन्यात ११ रुग्ण, तर कुठ्ठाळी परिसरात जानेवारी ते जून २०२१ पर्यंत ३६ डेंग्यू रुग्ण सापडले. यात जून महिन्यात ११रुग्ण होते.

निरीक्षण अहवाल पाठवला
पावसाळ्यामध्ये उद्‍वणाऱ्या व्हेक्टर बोर्न रोगांवर नियंत्रण ठेवणाऱ्या राज्य टास्क फोर्सच्या गाभा समितीने येथील वाडे व नवेवाडे भागांतील बांधकामांच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी काही बांधकामांच्या ठिकाणी मार्गदर्शक तत्‍वांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे आढळून आले. पाहणीच्यावेळी निरीक्षण केलेल्‍या विविध गोष्टींचा अहवाल तयार करून सरकारच्या विविध यंत्रणांना पाठविण्यात येणार आहे.

Dengue patients in Goa
Goa Vaccination: पंधरा दिवसांत 2,18,955 जणांना दिली लस

परिसरात निर्जंतुकीकरण
वास्‍को परिसरात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. यासंबंधी दखल काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागात निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली होती. तसेच काहीजणांनी जनजागृती केली होती. आता डेंग्युसंबंधी दखल घेताना राज्य टास्क फोर्सच्या गाभा समितीने येथील काही भागांना भेटी देऊन पाहणी केली. याप्रसंगी समितीच्या राज्य कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्पना महात्मे, गोवा कॅनचे समन्वयक रोलँड मार्टिन्स, वास्को आरोग्य केंद्राच्या डॉ. रश्मी खांडेपारकर, सॅनिटरी निरीक्षक दयानंद ठक्कर, मुरगाव पालिकेचे अधिकारी, मामलेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, मजूर खाते इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर पथकाने दोन इमारतीच्या बांधकामस्थळांना व काही निवासी भागांना भेट दिल्या. डॉ. खांडेपारकर यांनी तेथे असलेल्या मजुरांना व इतरांना डासांच्या प्रजनन स्थळ, डासांच्या अळ्या, रसायन फवारणी, वगैरे संबंधी माहिती दिली.

Dengue patients in Goa
Goa: 31 जुलैपर्यंत साडे अकरा लाख व्यक्तींना देणार कोरोना लस- सावंत सरकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com