'या' व्यवसायातून आत्मनिर्भर होत 'त्यांनी' अनेकांसाठी उभ्या केल्या रोजगाराच्या संधी

अनेकांना दिला रोजगार: दररोज 300 ते 500 लिटर दुग्धोत्पादन
Trupti Gawas
Trupti Gawas Dainik Gomantak
Published on
Updated on

Dairy Business हाताला काम मिळत नाही. अशी अनेकांची ओरड आहे. परंतु कुठलंही काम, कुठलाही व्यवसाय करायला लाज वाटत नसेल, तर कोणत्याही व्यवसायात यश मिळू शकते.

जिद्द, आत्मविश्वास बाळगून स्वतः आत्मनिर्भर होण्याबरोबरच इतर बेरोजगारांनाही रोजगार संधी द्यावी, या विचाराने दुग्धोत्पादन व्यवसायात उतरलेल्या चांदेल हसापूर येथील उद्योजिका तृप्ती दयानंद गावस यांनी इतरांपुढे आदर्श ठेवला आहे.

दररोज त्या 300 ते 500 लिटर दूध सातेरी हसापूर, संस्था या डेअरीत पुरवतात.

तृप्ती यांनी दूध व्यवसायात पाऊल टाकताच त्यांना त्यांचे पती दयानंद गावस यांचा पाठिंबा मिळाला. दूध व्यवसाय उदरनिर्वाहासह रोजगारनिर्मितीला कसा उपयुक्त होऊ शकतो, हे तृप्ती यांनी अनेकांना रोजगार देऊन दाखवून दिले आहे.

तृप्तीचा जन्म पेडणे तालुक्यातील कृषी संपन्न अशा हसापूर गावात झाला. तृप्तीचे वडील नीळकंठ नाईक आणि आई दमयंती नाईक हे हाडाचे शेतकरी होते. त्यामुळे तिलाही शेतकामाची ओढ जडली.

Trupti Gawas
Colva Beach: 'आयकॉनिक बीच'ला फेकल कॉलिफॉर्मचे ग्रहण

पतीची दृष्टी गेली; तृप्ती खचली नाही !

2001 साली त्यांचे दयानंद गावस यांच्याशी तृप्तीचे लग्न झाले. 35 वर्षे त्यांचे पती या व्यवसायात असल्याने त्यांना पशु पालनाबद्दलची माहिती होती. तृप्तीने पतीला या व्यवसायात हातभार लावण्याचा निर्णय घेतला.

गाईंची निगा घेत त्यांचे दूध वेळच्यावेळी डेअरीत पोहोचवायचे हे सगळे काम त्या करू लागल्या. सगळं सुरळीत चालले होते, पण अचानक एक दिवस काळाने घात केला आणि त्यांच्या पतीची दृष्टी कायमची गेली.

तृप्ती यांच्यावर आभाळच कोसळले. पण त्यातूनही अजिबात खचून न जाता त्यांनी व्यवसाय स्वतःच्या खांद्यावर घेतला आणि गेली दहा वर्षे त्या स्वतः हा व्यवहार पहात आहेत.

Trupti Gawas
Sonsodo Garbage Fire: सोनसोडो कचरा प्लांटमध्ये पुन्हा आग; अग्निशमन दलाच्या जवानांची घटनास्थळी धाव

राज्य, राष्ट्रीय स्तरावरही सन्मान

दररोज 300 ते 500 लिटर दूध त्यांच्या गावातील सातेरी हसापूर संस्था नामक डेअरीत पुरवतात. तिथून दूध थेट गोवा डेअरीत जाऊन पोहोचते. यात त्यांना त्यांची मुलेही पुरेपूर मदत करतात.

सध्या त्यांच्याकडे 60 पेक्षा जास्त गाई असून आई जशी मुलांचा सांभाळ करते. तसा त्या गाईगुरांची निगा घेतात. दूध व्यवसायात एक महिला एवढी उत्तुंग भरारी घेते, याची राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर घेतली जाऊन अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. दिल्ली येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांना सन्मानितही करण्यात आलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com