शिक्षण संस्थांनी सुजाण नागरिक घडवावेत : राजू नायक

‘विद्या विकास मंडळ’ स्थापनादिन सोहळ्यात मान्यवरांचा गौरव
Educational Institutions Should Create Wise Citizens: Raju Nayak
Educational Institutions Should Create Wise Citizens: Raju NayakDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव : सध्याच्या स्पर्धेच्या युगात सामाजिक मूल्ये ऱ्हास पावत असल्याने समाजात सुबत्ता वाढत असतानाच भ्रष्टाचारी वृत्तीही वाढू लागली आहे. या स्थितीतून समाजाला सावरायचे असेल तर चांगले सुजाण नागरिक तयार होण्याची गरज आहे. ही जबाबदारी आता शिक्षण संस्थांनी उचलण्याची गरज आहे. शिक्षण संस्थानी फक्त विद्वान तयार करून भागणार नाही. त्यांनी हा समाज सुधारणारे चांगले नागरिक तयार करण्याची गरज आहे, असे मत ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी व्यक्त केले.

Educational Institutions Should Create Wise Citizens: Raju Nayak
Goa Crime Branch : 15 लाख किमतीच्या 'एमडीएमए' सोबत नायजेरियन महिला ताब्यात

मडगाव येथील विद्या विकास मंडळ या संस्थेच्या स्थापना दिन कार्यक्रमात नायक यांच्या हस्ते समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले माजी विद्यार्थी, गुणवंत आणि ज्येष्ठ शिक्षक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारमूर्तीच्या वतीने आलेक्स सिक्वेरा, शकुंतला भरणे, अजित दळवी, सरोजिनी सार्दिन, डॉ. सुधीर नरसापूर व आमंदा वाझ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक व निवृत्त कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यांच्यावतीने एवरीडा जॅकीस यांनी सत्काराला उत्तर दिले.

यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष नितीन कुंकळयेकर, माजी अध्यक्ष शीला गावणेकर, रामनाथ कारे, गणेश दैवज्ञ, सचिव मधुकर मल्ल्या, मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी असलेले नागेश बेणे, शाणू पाणंदीकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दामोदर वाणिज्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आलेक्स सिक्वेरा, शकुंतला भरणे, अजित दळवी, संतोष देसाई, जितेंद्र अगरवाल, कारे कायदा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सरोजिनी सार्दीन, विद्या विकास अकादमीचे माजी विद्यार्थी डॉ. सुधीर नरसापूर, डॉ. व्हेन मास्कारेन्हस, डॉ. ओंब्रेटा बार्रेटो, आमंदा वाझ आणि एरोन नोरोन्हा यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत नितीन कुंकळयेकर यांनी तर मधुकर मल्ल्या यांनी आभार मानले.

शिक्षण क्षेत्रात विद्या विकास मंडळ संस्थेने आतापर्यंत मोठी झेप घेतली असून या संस्थेचा उत्कर्ष आणखी चांगल्या प्रकारे व्हावा,असा आपला मानस आहे.

-नितीन कुंकळयेकर, अध्यक्ष, विद्या विकास मंडळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com