एकाच कारचालकाची 2 दुचाकी अन् एका ट्रकला धडक, चालकासह पादचारी गंभीर जखमी

Goa Accident: दोघांनाही उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
Khandepar Accident
Khandepar AccidentDainik Gomantak

Ponda: ओपा-खांडेपार तिठ्यावर आज गुरुवारी एका कारचालकाने दोन दुचाकी व एका ट्रकला धडक देत रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या पादचाऱ्याला ठोकरल्याने हा पादचारी व कारचालक दोघेही जखमी झाले. दोघांनाही उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दुपारी सव्वाएकच्या सुमारास हा अपघात झाला.

जीए 07 के 5680 या क्रमांकाच्या कारगाडीने चुकीच्या मार्गाने जाऊन खांडेपार (Khandepar) येथीलच उदय नागेशकर (57) यांना ठोकर दिली. त्यानंतर एका ट्रकला व दोन दुचाकींनाही या कारचालकाने ठोकरले व स्वतःही जखमी झाला. या अपघातात उदय नागेशकर गंभीर जखमी झाले तर कारचालक अशोक नाईक (66, पाळी) हासुद्धह जखमी झाला. दोघांनाही फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

Khandepar Accident
Goa School Education : शालेय शिक्षण निर्देशांकात गोवा मागेच

दरम्‍यान, अपघातानंतर (Accident) स्थानिकांनी धाव घेत लगेच मदतकार्य केले. त्यानंतर फोंडा पोलिसांना या अपघाताची माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सोडवली व पंचनामा केला. दरम्यान, उदय नागेशकर हा काही वस्तू खरेदीसाठी बाजारात आला होता, त्यावेळी अशोक नाईक याचा कारवरील ताबा गेल्याने त्याने त्याला ठोकरले अशी माहिती देण्यात आली. कारचालक दारुच्या नशेत होता, त्याने तशी कबुली दिली आहे.

Khandepar Accident
Queen Elizabeth II Death: परदेशात स्थलांतरित गोमंतकीयांकडूनही राणीला श्रद्धांजली

हा अपघात सव्वाएकच्या सुमारास घडला. जर हा अपघात पंधरा मिनिटे उशिरा झाला असता तर अनेक विद्यार्थी जखमी झाले असते. दीडच्या सुमारास या तिठ्यावर एमआयबीके (MIBK School) विद्यालयातील विद्यार्थी बससाठी थांबतात. अपघातावेळी सुदैवाने एकही विद्यार्थी तेथे नव्‍हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com