Goa News: सोशल मीडियावर प्रतिक्रिया : एकास अटक

राज्यभर मुस्लीम समाजातर्फे वेगवेगळ्या पोलिस स्थानकांत निवेदन सादर
Muslim Community Gathered in Mapusa Police Station
Muslim Community Gathered in Mapusa Police Station Dainik Gomantak
Published on
Updated on

Tension in Goa Over Defamatory Post: धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्याप्रकरणी असोसिएशन ऑफ मुस्लीम जमात, वाळपई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशन भिंगो नाईक (वय २६, रा. मासोर्डे-सत्तरी) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांतच त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. आज राज्यभर मुस्लीम समाजातर्फे वेगवेगळ्या पोलिस स्थानकांत निवेदन सादर करण्यात आले.

Muslim Community Gathered in Mapusa Police Station
Goa Cricket Association: दर्शन मिसाळकडे गोव्याचे नेतृत्त्व कायम

वाळपई पोलिस स्थानकात दुपारी चारच्या सुमारास तक्रार दाखल करण्यात आली. मासोर्डे येथील किशन नाईक याने सोशल मीडियावरील पोस्टवर प्रतिक्रिया (कमेंट) व्यक्त करून मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी पोलिस स्थानकात सुमारे २०० जणांचा जमाव होता. वातावरण तणावपूर्ण बनले होते. पाेलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि निरीक्षक दिनेश गडेकर यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांनी किशन नाईक याला अटक करण्याची मागणी लावून धरली. अखेर वाळपई पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून किशन नाईक याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा नोंदवून अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mapusa
Goa Congress
Margao platform fight incident
online investment fraud arrested
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com