"45 मिनिटं कोणी आलंच नाही...!" 50 हजार रोख पाहून प्रवासी चक्रावला, दाबोळी विमानतळावर अजब प्रकार; 'बेवारस बॅग'ची Post Viral

Dabolim airport viral news: गोव्यातील दाबोळी विमानतळावर एका प्रवाशाला बेवारस अवस्थेत एक महागडी बॅग सापडली.
Reddit Goa viral post
Reddit Goa viral postDainik Gomantak
Published on
Updated on

Goa airport bag incident: गोव्यातील दाबोळी विमानतळावर एका प्रवाशाला बेवारस अवस्थेत एक महागडी बॅग सापडली. त्या प्रवाशाने विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यापूर्वी ती बॅग उघडण्याचा धाडस केले आणि आत जे काही सापडले, त्याने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. या प्रवाशाने 'रेडिट'वर (Reddit) हा संपूर्ण अनुभव कथन केला आहे, जो आता तुफान व्हायरल होतोय.

बेवारस बॅग उघडण्याचे धाडस

प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, तो सायंकाळी बोर्डिंग गेट 'G' समोर शांतपणे बसला होता, तेव्हा शेजारील सीटवर त्याला एक काळी एमके (MK) बॅग दिसली. ४५ मिनिटे झाली तरी कोणीही ती बॅग घेण्यासाठी आले नाही. प्रवाशाने एअरलाईन कर्मचाऱ्याला याची माहिती दिली, पण त्यांनी त्याला एअरपोर्ट सुरक्षा कर्मचाऱ्यांशी बोलायला सांगितले. त्यानंतर प्रवाशाने जो निर्णय घेतला, त्यामुळे ऑनलाइन अनेक भुवया उंचावल्या आहेत.

प्रवाशाचे धाडस

"मी विचार केला, ही विमानतळाच्या आतली बॅग आहे, यात काही धोकादायक वस्तू असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मला वाटले की मी आत एखादे ओळखपत्र शोधून त्या व्यक्तीशी संपर्क साधू शकेन," असे सांगत त्याने ती बॅग उघडली.

बॅग उघडल्यावर आतमध्ये फक्त रोख रक्कम (५०० रुपयांच्या नोटांचे बंडल), काही सुटे पैसे आणि एक लिपस्टिक सापडली. प्रवाशाच्या अंदाजानुसार, ती रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा जास्त होती.

Reddit Goa viral post
Dabolim Airport: ‘दाबोळी’ बंद करण्याचे गुदिन्होंचे प्रयत्न! विरियातोंचा आरोप; वास्कोतील उड्डाणपूल बनला कळीचा मुद्दा

सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द

त्यानंतर प्रवाशाने ती बॅग बंद केली आणि विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेचच ती बॅग तपासणीसाठी कनव्हेयर बेल्टवर ठेवली आणि त्यातील रक्कम मोजली, जी ५०,००० रुपयांहून अधिक होती. कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाचे संपूर्ण तपशील नोंदवून घेतले. प्रवाशाने पोस्टच्या शेवटी म्हटले की, "जी व्यक्ती फक्त पैसा आणि लिपस्टिकच्या जोरावर जग जिंकू शकते, तिला तिची बॅग परत मिळावी अशी माझी इच्छा आहे."

'रेडिट' वापरकर्त्यांकडून गंभीर प्रश्न

या प्रवाशाने बॅग उघडल्यामुळे ऑनलाइन अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बहुतांश 'रेडिट' वापरकर्त्यांनी असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.अनेक युजर्सनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उल्लेख करत, “तुम्ही बॅग उघडताना दिसला असता, तर तुम्ही इथे पोस्ट केली नसती,” असे म्हटले आहे.

तसेच, मालकाने जास्त पैसे चोरल्याचा दावा केल्यास काय, असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे. "ही फसवणूक असू शकते," तर काहींनी “एका महागड्या बॅगेत ५० हजार रुपये रोख ठेवून कोण चुकून विसरू शकते? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे,” अशी शंका उपस्थित केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com