Goa Culture: रसिकांची दाद कलावंतांना प्रेरणादायी; अभिनेत्री नयना आपटे यांचे प्रतिपादन

मांद्रे देऊळवाडा येथे नाट्य कलावंतांचा सत्कार
Goa Culture
Goa CultureDainik Gomantak

Goa Culture: मराठी रंगभूमीवर काम करताना रसिकांकडून भरभरून प्रेम मिळाले. खास करून ग्रामीण भागातील रसिकांकडून मिळालेली दाद आमच्यासाठी स्फूर्तीदायक आहे,असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांनी केले.

मांद्रे येथील श्री भगवती सप्तेश्वर देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त श्री भगवती सप्तेश्वर सांस्कृतिक मंडळाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मराठी रंगभूमीवरील प्रथितयश व मांद्रेतील हौशी रंगकर्मींचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या सत्काराला उत्तर देत होत्या.

Goa Culture
Illegal Liquor in Goa: ‘सिंग लिकर’च्या मालक, चालकाला ‘शो-कॉज’; अबकारी खात्याची कारवाई

आपटे म्हणाल्या,की गोव्यातील गावागावातील नाट्य कलाकारांनी नाट्य कलेची चांगल्या प्रकारे सेवा केली आहे. त्याचा वारसा आजच्या पिढीने पुढे न्यायला हवा.

प्रमुख पाहुणे म्हणून मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे उपस्थित होते. खास निमंत्रित म्हणून ‘आयएमबी’चे उपाध्यक्ष गोरख मांद्रेकर, मांद्रेचे पंच प्रशांत नाईक, संपदा आसगांवकर तसेच श्री भगवती सप्तेश्वर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष धीरज मांद्रेकर, केशव मांद्रेकर,सल्लागार अजय मांद्रेकर आदी उपस्थित होते.

सत्कारमूर्तींमध्ये मराठी रंगभूमीवरील प्रतिथयश कलाकार पद्मश्री नयना आपटे, आकाश बैसावे ,अंकुर वाढवे तसेच मांद्रे तील हौशी रंगभूमीवरील कलाकार अजित मांद्रेकर,भालचंद्र मांद्रेकर, गुरुनाथ गोवेकर, द्वारकानाथ गोवेकर, मंगेश सावंत, भास्कर म्हामल, भालचंद्र म्हामल,सोनू नाईक, वसंत नाईक,आदींचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ,व स्मृतिचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.

यावेळी गोरख मांद्रेकर यांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले.

धीरज मांद्रेकर ,केशव मांद्रेकर,निखिल मांद्रेकर,विजेश मांद्रेकर ,गुरूदास सातार्डेकर आदिंनी मान्यवरांना पुष्पकुंडी प्रदान करून स्वागत केले. प्रशांत मांद्रेकर यांनी सूत्रसंचालन केले.केशव मांद्रेकर यांनी आभार मानले.

मराठी रंगभूमीवरील कलाकार हे भारतीय अभिजात कलेचे रक्षक आहेत. अभिजात कलेचा हा वारसा चिरंतनपणे जतन करण्यासाठी आजच्या पिढीने पुढे येण्याची गरज आहे. नव्या पिढीने आधीच्या पिढीने जपलेली कला वृद्धिंगत केली पाहिजे.

-दयानंद सोपटे, माजी आमदार

‘वासूची सासू’ला रसिकांची दाद

यावेळी ‘वासुची सासू’ हे धमाल विनोदी नाटक सादर करण्यात आले. यात अंकुर वाढवे, अमोघ चंदन, तपश्या नेवे, सुयश पुरोहित, संजना पाटील, दीपक जॉईल, मयुरेश पंडित,आणि विक्रमार्जुन आकाश भेडसावळे,व पद्मश्री नयना आपटे यांनी भूमिका केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com