Goa PWD Workers: सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी PWD कर्मचारी रस्त्यावर...

मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन
Goa PWD Workers Protest
Goa PWD Workers Protest Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa PWD Workers Protest: सातव्या वेतन आयोगाचे लाभ विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत असताना प्रशासनातील काही घटकांना मात्र अद्यापही या आयोगाच्या तरतुदी लागू झालेल्या नाहीत.

त्यामुळे सरकारी यंत्रणेतील हे घटक सातत्याने याबाबाबत विविध मार्गांनी आंदोलन करत असतात. त्याचाच भाग म्हणून आता गोव्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातले कर्मचारीही याच मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

Goa PWD Workers Protest
Goa Fraud Case: उत्तर प्रदेशच्या कंपनीचा गोव्यातील 1000 गुंतवणुकदारांना गंडा; सुमारे 10 कोटी लुबाडले

मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी आम्हालाही सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी करत विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना मांडल्या. इतकी वर्षे झाली आम्ही सर् कर्मचाऱी इमानेइतबारे सेवा देत आहोत. तथापि, सरकार दरबारी आमची दखल घेतली जात नाहीय. आमच्या पगारात वाढ झालेली नाही, तसेच आम्हाला सातवा वेतन आयोगदेखील लागू झालेला नाही. त्यामुळे आयोगाच्या तरतुदीनुसारचे कोणतेही लाभ आम्हाला मिळत नाहीत.

Goa PWD Workers Protest
Drishti Lifeguards : गोव्यात 5 पर्यटकांना जीवदान; दृष्टी जीवरक्षकांची कामगिरी

सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत याआधीही बऱ्याचदा प्रशासनाकडून, वरिष्ठांकडून, राजकीय नेत्यांकडून वारंवार आश्वासने देण्यात आली आहेत. तथापि, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळेच सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी आम्ही या धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.

समान कामासाठी समान वेतन मिळावे, वैद्यकीय लाभ मिळावेत, पद आणि श्रेणीत सुधारणा व्हावी, त्याची अंमलबजावणी व्हावी, रजेबाबतच्या तक्रारीही दूर व्हाव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

दरम्यान, सरकार दरबारी आमचा आवाज पोहचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. यापुढील काळात सातव्या वेतन आयोगासाठीचा लढा आणखी तीव्र करू, असा इशाराही यावेळी या कर्मचाऱ्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com