Goa Crime: क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीतून मोठ्या परताव्याचे आमिष; गोव्यातील कुटुंबाला 4.82 कोटींचा गंडा

Crypto Currency Fraud: क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून घोटाळेबाजांनी एका परिवाराला गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस
Goa Crime News
Goa Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

कुडचडे: देशभरात सध्या गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे आणि यात गोव्याचा देखील समावेश होतो. गोव्यात अलीकडे मोठया परताव्याचे अमिश दाखवून पैसे लुबाडण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. कुडचडे येथील एका परिवाराला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून घोटाळेबाजांनी सुमारे ४.८२ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

कुडचडे येथील रहिवासी रुपेश बांदेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे कक्षाने सुकांता भौमिक आणि अजय दोडामणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार रुपेश बांदेकर याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ऑनलाइन गेम सेवा कंपन्यांचे संचालक आणि व्यवस्थापक असल्याचा दावा करत भौमिक आणि दोडामणी यांनी १५ जुलै ते १० ऑक्टोबर २०१७ या कालावधीत बांदेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. घोटाळेबाजांनी बांदेकर कुटूंबाला कंपनीत गुंतवणूक करायला सांगितले आणि याबदल्यात आकर्षक मोबदला देखील मिळेल असे आश्वासन दिले.

बांदेकर कुटुंबाने त्यांच्या नातेवाईकांसह एकूण ५.८ बिटकॉइन्सची गुंतवणूक केली, ज्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे ४.६ कोटी रुपये अशी होते.

Goa Crime News
Crypto Currency Racket: 'सायबर स्लेव्ह'चा शिकार ठरलेल्या आशिषची अखेर सुटका! वाचा अंगावर शहारा आणणारी घटना

क्रिप्टोकॉइनशॉपिंग डॉट कॉम या आरोपीद्वारे चालवल्या जाणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून बांदेकर आणि कुटुंबीयांनी गुंतवणुकीला सुरुवात केली. शिवाय त्यांनी गोवन गेम्स ऑनलाइन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये २२ लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केली.

गुंतवणुकीच्या सुरुवातीला बांदेकर आणि परिवाराला चांगला परतावा मिळाला, मात्र काहीकाळानंतर भौमिक आणि दोडामणी यांनी बांदेकरांना पैसे देणं बंद केलं आणि काही काळातच गुंतवलेली उर्वरित ३ लाखांहून अधिक रक्कम घेऊन गायब झाले. गोव्यात घडलेल्या या प्रकरणाचा सध्या पोलिस अधीक्षक अर्शिल आदिल आणि डीवायएसपी फ्रान्सिस्को कोर्टे यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com