पिसुर्ले: गोवा विधानसभेच्या निवडणूक (Election) फेब्रुवारी 2022 मध्ये जवळजवळ निश्चित झाल्या आहेत, त्यामुळे राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घरघर चलो अभियान, कोपरा बैठका, तसेच जाहीर सभा घेण्यावर भर दिला आहे, परंतू पर्ये मतदार संघात अजून पर्यंत वाळपई मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे आरोग्यमंत्री (Minister of Health) विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्या पंचायत पातळीवरील जाहीर सभा तसेच प्रभाग पातळीवरील कोपरा बैठका वगळता इतर कोणत्याच पक्ष किंवा उमेदवारांनी अद्याप जाहीर सभा घेतलेल्या दिसत नाही. त्यामुळे या मतदार संघात फक्त आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्याच सभांना वेग आलेला दिसत आहे.
सन 2017 साली संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस (Congress) पक्षाला सरकार स्थापन करण्यास आलेले अपयश पाहून वाळपई मतदार संघातून कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणून आलेले विश्वजीत राणे यांच्यानी सत्तरी तालुक्यातील जनतेच्या हितार्थ पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप पक्षांत प्रवेश केला आणि लागलीच आरोग्य मंत्री बनले.
त्यानंतर सत्तरी तालुक्यातील दोन्ही मतदार संघातील कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आरोग्यमंत्र्या बरोबर भाजप (BJP) पक्षांत सामिल झाले, तेव्हा पासून सत्तरी तालुक्यात भाजप पक्षाचे वजन वाढले आहे. त्यामुळे आज तालुक्यातील बारा पंचायती, एक नगरपालिका तसेच तिन जिल्हा पंचायती या आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या सहकार्याने भाजप कडे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सदर पक्ष प्रवेश झाल्या नंतर संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना मतदारांनी विक्रमी मतदान करून पुन्हा भाजप पक्षाच्या चिन्हावर निवडणून आणले, त्याच प्रमाणे 2017 साली संपन्न झालेल्या पंचायत निवडणूकीत आरोग्य मंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) यांच्या प्रयत्नाने सर्व पंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकावला, त्यानंतर मागिल वर्षी संपन्न झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत होंडा, नगरगाव तसेच केरी मतदार संघात आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे समर्थक उमेदवार निवडून आले आणि त्यामुळे या तीन जिल्हा पंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकावला, यामुळे त्यांच्या विरोधात असलेल्या इतर राजकीय पक्षांनी आपली तलवार म्यान करून ठेवली आहे ती अजून पर्यंत तशीच आहे.
परंतु आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी मात्र अवघ्या तीन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पंचायत पातळीवर जाहीर सभाचा धडका लावला आहे. त्याच प्रमाणे गावा गावात जाऊन कोपरा बैठका घेऊन कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले आहे. त्याचाच परिणाम म्हणूनच फक्त पंचायत पातळीवर घेतल्या जाणाऱ्या जाहीर सभांना सभागृह सुद्धा कमी पडू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संपन्न होणाऱ्या खऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीत घेतल्या जाणाऱ्या जाहीर सभांना किती गर्दी होणार याची कल्पना करता येणार नाही.
त्यामुळे येणाऱ्या काळात विरोधी पक्षाच्या उमेदवारांना आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना टक्कर देण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार असल्याचे चिन्हे त्यांच्या जाहीर सभेत होणाऱ्या गर्दीतून दिसून येत आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या तरी पर्ये मतदार संघात भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाच्या जाहीर सभा (Public meeting) किंवा बैठका झालेल्या दिसत नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.