Goa: सरकारी योजनेवरील टीका राजदीप नाईकांना पडली महागात !

नाईक यांनी सायंकाळी उशिरा आद्यत विरोधात फोंडा पोलीस स्थानकात (Fonda Police Station) तक्रार नोंद केली आहे.
 Car
CarDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: महामारीच्या (Covid 19) काळात रोजगार गमावलेल्या कलाकारांना मदत म्हणून एकरकमी 10 हजार रुपये देण्याच्या कला व संस्कृती खात्याच्या योजनेवर टीका करणारा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर नाट्य कलाकार राजदीप नाईक (Rajdeep Naik) यांची गाडी फोडण्याचा प्रकार घडल्याने सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. नाईक यांनी सायंकाळी उशिरा आद्यत विरोधात फोंडा पोलीस स्थानकात (Fonda Police Station) तक्रार नोंद केली आहे.

नाईक यांनी काल शनिवारी हा व्हिडीओ प्रसारित केला होता. त्यात कलाकारांना ही 10 हजारांची भीक देऊन त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचवू नका असे त्यांनी म्हणत कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आज सकाळी नाईक हे उठल्यावर त्यांना रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या त्यांच्या गाडीची पाठची काच फोडून ठेवल्याचे दिसून आले.

 Car
Goa: धनगर समाजाच्या विषयावर, मुख्यमंत्री उद्या घेणार अमित शहांची भेट

'गोमंतक'शी (Gomantak) बोलताना नाईक म्हणाले, माझ्या गाडीची काच फोडणे या घटनेचा त्या व्हिडीओशी संबंद असावा अशी मला खात्री वाटते. माझ्या घराकडे गाडी नेता येत नसल्याने मी ती रस्त्यावरच पार्क करतो. मागची कित्येक वर्षे मी माझी गाडी रस्त्यावर ठेवत आलो आहे पण असा प्रकार कधी घडला नव्हता असे ते म्हणाले .

राजदीप नाईक हे पूर्णवेळ नाट्य कलाकार असून या महामारीत नाटके बंद झाल्याने त्यांचा रोजगार बंद झाल्याने त्यांनी आपला व्यवसाय सध्या बदलला असून करमणुकीचे कार्यक्रम बंद असल्याने हजारो कलाकार रोजगाराला मुकले असून आपण त्यांच्यासाठी आवाज उठविला होता असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारांनी आपला आवाज बंद होणार नसून तो आणखीनच बुलंद होईल असे नाईक यांनी म्हटले आहे.

 Car
Goa: 'नोकऱ्या मिळवून द्या' भंडारा समाजाचे आमदार झांट्येंना निवेदन

दरम्यान हे असले प्रकार निंद्य असून कलाकारांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com