Goa Tourist: नाशिकच्या पर्यटकांची गोव्यात 'गुंडगिरी', क्षुल्लक कारणावरून कारचालकाला बेदम मारहाण; Watch Video

Viral Video: सोशल मीडियावर सध्या गोव्यातील एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोन पर्यटकांमधील तुंबळ माराहाणीचा आहे.
Goa Crime: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात राडा! कारचालकाला बेदम मारहाण, Video Viral; पोलिसांकडून दोघांना अटक
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Nashik Tourist Beating Local Driver in Goa Viral Video

पणजी : सोशल मीडियावर सध्या गोव्यातील एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोन पर्यटकांमधील तुंबळ माराहाणीचा आहे. गुरुवारी (6 फेब्रुवारी) सायंकाळी 4.30 वाजता सांगोल्डा येथील चोगुम रोडवरील युनियन बँकेच्या समोर दोन पर्यटकांनी कारचालकाला बेदम मारहाण केली. माराहाण करणारे हे दोघेही महाराष्ट्रातील नाशिक येथील असल्याचे सांगितले जात आहे. साळगाव पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या.

Goa Tourist व्हिडिओ पाहा

नेमकं प्रकरण काय?

कारचालक पर्वरीहून (Porvorim) साळगावकडे निघाला होता. जेव्हा तो सांगोल्डा येथील युनियन बँकेजवळ पोहोचला तेव्हा येथे एका स्कूटरला त्याने धडक दिली. धडक बसताच स्कूटरवरील पर्यटकांचा संताप अनावर झाला. त्यांनी स्कूटरवरुन उतरुन कारचालकाला कारच्या बाहेर ओढत मारहाण करण्यास सुरुवात केली. स्कूटर चालकाने हातात असणारे हेल्मेट दोनदा त्याच्या डोक्यात मारले. त्यांच्या या राड्यामुळे सांगोल्डा रस्त्यावर काही वेळ ट्रॅफिक जाम झाले. पोलिसांनी स्कूटरचालक फैज आणि अर्कन यांना ताब्यात घेतले.

Goa Crime: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात राडा! कारचालकाला बेदम मारहाण, Video Viral; पोलिसांकडून दोघांना अटक
Goa Cyber Crime: गोलमाल है! गोव्यातील सायबर गुन्ह्यांमध्ये गमावले तब्बल *0* कोटी रुपये, वाचा पोलिसांनी काय सांगितले?

मारहाण करणारे पर्यटक महाराष्ट्रातील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागा येथून फैज शब्बीर शेख (वय वर्ष, 23) आणि अर्कान अझीझ शेख (वय वर्ष। 22) राहणार नाशिक, महाराष्ट्र अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कलम 126(2), 118(1) आर/डब्ल्यू 3 (5) बीएनएस अंतर्गत या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com