Goa ED Arrest: 'ईडी'ने गोव्यात केनियन नागरिकाला केली अटक; हणजुणमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

पर्यटन उद्योगात कामाच्या आमिषाने आफ्रिकन मुलींना आणायचा; केनियाच्या 2 युवतींची सुटका
Goa ED Arrest: | Anjuna Sex Racket
Goa ED Arrest: | Anjuna Sex RacketDainik Gomantak
Published on
Updated on

ED Arreste Kenian National in Goa: आफ्रिकन मुलींची भारतात देह व्यापारासाठी तस्करी केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली. यात गुरूवारी या रॅकेटशी संबंधित एका केनियन नागरिकाला गोव्यातून अटक करण्यात आली आहे.

न्यूटन मुथुरी किमानी असे या केनियन नागरीकाचे नाव आहे. त्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत 9 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तो स्टुंडट व्हिसावर भारतात आला होता, असे केंद्रीय एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे.

पणजी येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला 15 डिसेंबरपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे.

दरम्यान, हणजूण पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. यात दोन विदेशी नागरिकांसह चार दलालांना अटक करण्यात आली आहे. तर केनियाच्या दोन युवतींची सुटका करण्यात आली आहे.

Goa ED Arrest: | Anjuna Sex Racket
Goa Government Hotels: स्वस्तात गोवा ट्रिप करायचीय? मग 'या' सरकारी हॉटेल्समध्ये करा बुकिंग

मानवी तस्करीत गुंतलेल्या इस्रालाइट उर्फ ​​डोरकास्ट मारिया आणि ओलोकपा या दोन नायजेरियन नागरिकांविरुद्ध गोवा पोलिसांनी (हणजुण पोलीस स्टेशन) एफआयआर दाखल केल्यामुळे मनी लाँड्रिंग प्रकरण उघडकीस आले.

ईडीने म्हटले आहे की, आरोपी या तरूण आफ्रिकन मुलींना भारतातील टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नोकरी देण्याच्या बहाण्याने गोव्यात आणायचा. आणि त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जायचे.

किमानी एकाचवेळी अनेक बँक खात्यातून व्यवहार करत होता. यात कथितरित्या मानवी तस्करी रॅकेटमध्ये गुंतलेल्या अनेकांकडून ठराविक रक्कम जमा केली जात होती.

Goa ED Arrest: | Anjuna Sex Racket
Indian Railway: गोव्याकडे येणाऱ्या ट्रेन्सला प्रदिर्घ वेटिंग; नवीन वर्षात रेल्वे प्रवास ठरणार त्रासदायक?

बेकायदेशीर मार्गाने निर्माण केलेला हा पैसा काही संशयित हवाला ऑपरेटरच्या मदतीने Mpesa अॅप आणि काही परदेशी बँक खात्यांद्वारे केनिया आणि इतर देशांमध्ये हस्तांतरित केला जात होता.

हणजुणेत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

या प्रकरणी एजन्सीने हणजुण परिसरातही शोध घेत छापेमारी केली होती आणि दोन केनियन युवतींची सुटका केली होती. पंजाब आणि गुजरातमधुनही या रॅकेटशी संबंधित दस्तऐवज आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com