Goa Crime: आधी शाब्दिक चकमक, मग रक्तरंजित वाद; कळंगुटमध्ये दुकानाच्या हिश्यावरून एकावर जीवघेणा हल्ला

Stabbing in Calangute: कळंगुट येथील टिटोस लेन परिसरात दुकान भागीदारीच्या मालकी हक्कावरून झालेल्या एका भीषण वादामुळे दोन तरुणांमध्ये हिंसक संघर्ष उफाळला
Titos Lane Calangute Dispute
Titos Lane Calangute Dispute Dainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Attack News: कळंगुट येथील टिटोस लेन परिसरात दुकान भागीदारीच्या मालकी हक्कावरून झालेल्या एका भीषण वादामुळे दोन तरुणांमध्ये हिंसक संघर्ष उफाळला. या हाणामारीत एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला असून, त्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. ही घटना शनिवार (१२ जुलै) रोजी घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेतील मुख्य व्यक्ती आकाश लमाणी आणि परशुराम लमाणी अशी आहेत. हे दोघेही कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील रहिवासी असून, कळंगुट येथे कामासाठी वास्तव्यास आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी हे दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात व्यावसायिक संबंध होते. त्यांच्यात गेल्या काही काळापासून दुकान भागीदारीच्या मालकीवरून वाद सुरू होता, जो शनिवारी विकोपाला गेला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी टिटोस लेन येथील एका दुकानाजवळ आकाश आणि परशुराम यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. हा वाद इतका वाढला की, तो हाणामारीत बदलला. याचदरम्यान, आकाश लमाणीने कथितरित्या परशुराम लमाणीवर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केला. परशुरामवर झालेल्या या हल्ल्यामुळे त्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या.

Titos Lane Calangute Dispute
Goa Crime: 23 वर्षीय युवक ‘ड्रग्स पॅडलर’! सत्तरीतील बारवर छापा; 631 ग्रॅम गांजा ताब्यात

स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि परशुरामला कळंगुट येथील स्थानिक दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्याच्या जखमांची गंभीरता लक्षात घेता, त्याला पुढील उपचारांसाठी तातडीने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. त्याची प्रकृती सध्या स्थिर असली तरी, जखमा गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

या घटनेनंतर, हल्ला करणारा आकाश लमाणी तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला. कळंगुट पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी आता आकाश लमाणीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com