Goa Crime: रुमडामळ हाऊसिंग बोर्ड येथील दुकानात चोरी; 15 हजार रोकड, सोन्यासह 2 लॅपटॉप लंपास

भरवस्तीतील इलेक्‍ट्रीकल कंत्राटदाराचे कार्यालय फोडले
Goa Crime | Rumdamol Theft
Goa Crime | Rumdamol Theft Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: रुमडामळ-हाऊसिंगबोर्ड येथील महादेव कोमरपंत या इलेक्‍ट्रीकल कंत्राटदाराचे कार्यालय फोडून 2 लॅपटॉप, 60 हजारांचे सोने आणि 15 हजार रोख असा एकूण दीड लाखांचा ऐवज पळवून नेला.

गुरूवारी रात्री भर वस्‍तीत असलेले हे कार्यालय चोरट्यांनी फोडल्‍याने या परिसरात लोकांमध्‍ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

हे कार्यालय मारुती मंदिराच्‍या मागे असून पूर्वी कोमरपंत हे स्‍वत: तिथे राहायचे. मात्र आता ते दुसरीकडे राहायला गेल्‍यामुळे या वास्‍तूचा ते कार्यालय म्‍हणून उपयोग करत होते. गुरूवारी रात्री 9 वाजेपर्यंत त्‍या कार्यालयात काम चालू होते. त्‍यानंतर कार्यालयातील कर्मचारी घरी गेले.

Goa Crime | Rumdamol Theft
Goa vs Varanasi: पर्यटकांच्या संख्येत वाराणसीने गोव्याला टाकले मागे; गोव्यात 1 कोटी तर वाराणसीत 13 कोटी पर्यटक

आज शुक्रवारी सकाळी एक कर्मचारी कामाला आला असतात त्‍याला पुढच्‍या बाजूला असलेले दोन्‍ही कुलूप तोडल्‍याचे दिसून आले. त्याने मालकाला याची कल्‍पना दिली.

त्‍यानंतर पोलिसांच्‍या उपस्‍थितीत कार्यालय उघडले असता, चोरट्यांनी आतील सामान अस्‍ताव्‍यस्‍त अवस्थेत टाकल्‍याचे दिसुन आले. चोरीला गेलेल्‍या दोन लॅपटॉपची किंमत अंदाजे ७५ हजार रुपये असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे.

पोलिसांनी नंतर श्वानपथकाला बोलावून चोरट्याचा माग घेण्‍याचा प्रयत्‍न केला पण श्वान परिसरातच घुटमळले. पोलिसांनी घटनास्‍थळावरील ठसेही काढून घेतले असून या प्रकरणात मायणा कुडतरीचे पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्‍ल गिरी हे तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com