Goa vs Varanasi: पर्यटकांच्या संख्येत वाराणसीने गोव्याला टाकले मागे; गोव्यात 1 कोटी तर वाराणसीत 13 कोटी पर्यटक

2 वर्षातील आकडेवारी आली समोर
Varanasi vs Goa Tourism:
Varanasi vs Goa Tourism:Dainik Gomantak

Varanasi vs Goa Tourism: देश-विदेशातील पर्यटक गोव्याला पसंती देत असल्यामुळे गोव्याला देशाची पर्यटन राजधानी म्हणतात. पण आता आकडेवारीच्या पुराव्यानुसार बोलायचे झाले तर गोव्यापेक्षा जास्त पर्यटक उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे भेट देत असल्याचे समोर आले आहे.

काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीपूर्वी पर्यटक वाराणसीत यायचे पण गेल्या दोन वर्षांत हे चित्र आणखी बदलले आहे. एका आकडेवारीनुसार, 2021 ते 2023 या कालावधीत पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात केवळ एक कोटी पर्यटक आले होते, तर वाराणसीमध्ये ही संख्या 13 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे.

गोवा म्हटले की, सुंदर समुद्रकिनारे, तेथील देशी-विदेशी पर्यटक, समुद्रातील जहाजांवरचे कॅसिनो, आलिशान हॉटेल्स आणि त्यांचे चकाचक वैभव डोळ्यासमोर येते. पण, काशीने अवघ्या 2 वर्षात पर्यटनाच्या क्षेत्रात गोव्याला मागे टाकले आहे.

Varanasi vs Goa Tourism:
Goa Crime: मोरजीत महाराष्ट्रातील पर्यटक महिलेवर बलात्कार; हॉटेल रूममधून प्रियकर बाहेर गेला अन् अज्ञात तरूण घुसला

वाराणसीला काशी आणि बनारस या नावांनीही ओळखले जाते. भगवान शंकराच्या या शहराने आता गोव्याला मागे टाकले आहे.

काय सांगतात आकडे

  • 2021 मध्ये 69 लाख भाविकांनी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले होते.

  • 2023 मध्ये ही संख्या 13 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे.

  • याचा अर्थ अवघ्या दोन वर्षांत पर्यटकांच्या संख्येत 20 पट वाढ झाली.

  • याच काळात गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या केवळ 1 कोटींवर गेली आहे.

  • काशीमध्ये रोजगारामध्ये 34 टक्के वाढ नोंदवली गेली. काशीचे उत्पन्नही 65 टक्क्यांनी वाढले आहे.

Varanasi vs Goa Tourism:
बेपत्ता झालेले 2 अल्पवयीन थेट गोव्यात; अनोळखी नंबरवरून फोन कॉल आला अन्...

दरम्यान, काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या बांधकामावेळी पुनर्वसनाचा मुद्दाही उपस्थित झाला होता. पण ताब्यात घेतलेल्या 300 मालमत्तांशी संबंधित लोकांचेही पुनर्वसन करण्यात आले आहे. यासंबंधीचे एकही प्रकरण न्यायालयात प्रलंबित नाही.

काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की हा कॉरिडॉर केवळ भव्य इमारत नसून ते आपल्या अध्यात्म, परंपरा आणि गतिशीलतेचे प्रतीक आहे. एवढेच नाही तर काशीच्या आर्थिक समृद्धीत नवा अध्याय जोडण्याचे काम हा कॉरिडॉर करेल, असेही ते म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com