Nepali Murder Case: ‘नेपाळी’च्‍या हत्येप्रकरणी 48 तासांत मारेकऱ्याचा शोध; 'हे' होते हत्येचे कारण

बहिणीवरून शिविगाळ केल्‍याने खून
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Nepali Murder Case: नेपाळी तरुण नबीन बी. के. (32) याच्या खूनप्रकरणी म्हापसा पोलिसांनी मारेकरी करण महादेव शिंदे (19, रा. गिरी, मुळ रा. सांगे) याला अटक केली. नबीन याने करणला बहिणीवरून शिविगाळ केली होती. या रागातून दारूच्या नशेत करणने 15 एप्रिल रोजी नबीनच्या गळ्यात दारूच्या बाटलीचा तुकडा खूपसून खून केला होता.

Goa Crime News
Karnataka Assembly Election 2023: विश्‍‍वजीत राणेंचा अस्खलित कानडीतून प्रचार; ‘उत्तर कन्‍नड’ची जबाबदारी

रोजंदारी कामगार असलेला करण हा काही महिन्यांपासून म्हापशात कामाला यायचा. शनिवारी संशयित करणने नबीनचा खून करून घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याला आज म्हापसा पोलिसांनी मोठ्या शिताफीने व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी करून अटक केली. पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पर्वरीत पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

दोघांनी सोबत केले मद्यप्राशन

शनिवारी रात्री संशयित करण व नबीन हे दोघेही दारू पिण्यास नवीन बसस्थानकाच्या खुल्या शेतजमिनीत एकत्र बसले होते. ‘यावेळी नबीनने बहिणीवरून आपल्याला शिविगाळ केली. या रागातून शेजारी पडलेला दारूच्या बाटलीचा काचेचा तुकडा उचलून त्याच्या गळ्यात खुपसला’, अशी कबुली करण शिंदे याने दिली आहे. गुन्ह्यावेळी संशयिताने अंगावर परिधान व रक्त लागलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com