Goa Crime: जेवण देतो, असं सांगत 16 वर्षांच्या मुलीला फ्लॅटवर नेलं; 58 वर्षांच्या नराधमाने केला बलात्कार

Goa Crime News: रात्रीच्यावेळी सदर संशयिताने त्या एकट्या मुलीला पाहिले. तो तिच्याजवळ गेला.
जेवण देतो, असं सांगत 16 वर्षांच्या मुलीला फ्लॅटवर नेलं; 58 वर्षांच्या नराधमाने केला बलात्कार
Goa Crime NewsDainik Gomantak

मडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 58 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीय आलीय. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.29) रात्री घडली.

संतोष रायकर (58) असे अटक करण्यात आलेल्या गाडा चालक संशयिताचे नाव आहे.

रात्रीच्यावेळी नावेली येथे एका दुकानाजवळ अडकून पडलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा उठवीत तिला, फ्लॅटवर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

सदर मुलगी आपल्या घरच्यांना न कळविता घराबाहेर पडली होती. मात्र रात्री पुन्हा ती घरी परतत होती. मात्र घरी जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध

जेवण देतो, असं सांगत 16 वर्षांच्या मुलीला फ्लॅटवर नेलं; 58 वर्षांच्या नराधमाने केला बलात्कार
Goa Congress: अमित पाटकरांचा गडकरींना ईमेल; कामाची यादी देत मागितली भेटीची वेळ

नसल्याने ती वाटेतच अडकून पडली. तिचा मोबाईलही बंद पडला होता. रात्रीच्यावेळी सदर संशयिताने त्या एकट्या मुलीला पाहिले. तो तिच्याजवळ गेला. तिचा मोबाईल फोन बंद पडल्याने तिने घरच्यांशी संपर्क साधण्यासाठी संशयिताकडे मोबाईल मागितला.

यावेळी तुला भूक लागली असेल तर तुला जेवण देतो असे सांगून संशयिताने त्या मुलीला आपल्या घोगळ- हाऊसिंग बोर्ड येथील फ्लॅटवर आणून नंतर तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com