
पणजी: आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात नागरिकांना घरोघरी भारतीय ध्वज फडकविण्याचे आवाहन केले आहे. देशभरातून केंद्रीय मंत्री आणि राजकीय नेते या अभियानात सहभागी होत असताना गोव्यातही मंत्री आणि नेत्यांनी घरावर भारतीय ध्वज फडकवला आहे. गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेल्या या अभियानात आता देशभरातून नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसुझा यांनी त्यांच्या म्हापसा येथील निवासस्थानी तिरंगा फडकावून अभिवादन केले. पंचायत आणि सार्वजनिक वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी देखील त्यांच्या घरी तिरंगा फडकावत अभियानात सहभाग नोंदवला. यासह मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री नीळकंळ हळर्णकर, पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी देखील त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावून अभिवादन केले.
१३ ते १५ ऑगस्ट असे तीन देशातील नागरिकांना घरी राष्ट्रीय ध्वज फडकाविण्याचे आवाहन केले आहे. पुरातत्व विभाग आणि कला आणि संस्कृती विभागाच्या वतीने पणजीत राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास उलघडून दाखवणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पाटो येथील संस्कृती भवन येथे हे प्रदर्शन १५ ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या वतीने मंगळवारी हर घर तिरंगा २०२५ साठी रॅली काढून जनजागृती केली. आपल्या घरी तिरंगा फडकावून देशभक्ती जागवणाऱ्या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. याशिवाय नागरिकांना सोशल मिडियावरील डिस्प्ले पिक्चर (डिपी) देखील बदलून तिरंगा करण्याचे आवाहन केले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तिरंगा फडकावला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले 'हर घर तिरंगा' अभियान आज देशाला एकतेच्या धाग्यात बांधण्यासाठी आणि देशभक्तीची भावना आणखी मजबूत करण्यासाठी एक जन मोहीम झाले आहे,” असे ट्विट गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.