Goa Crime: उसगावातून बेपत्ता झालेल्या 5 वर्षीय मुलीचा खून? घरापासून 50 मीटर अंतरावर दुसऱ्याच्या घरात सापडला मृतदेह

Usgaon Missing Girl Case: उसगाव येथे एका पाच वर्षीय चिमुरडीचा मृतदेह आढळल्यानं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: उसगाव येथे एका पाच वर्षीय चिमुरडीचा मृतदेह आढळल्यानं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सदर मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत काल (५ मार्च) दाखल केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आज (६ मार्च) मुलीचा मृतदेह तिच्या घरापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या घरात सापडला आहे.

मुलीचा मृतदेह तिच्या घरापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या शेजारील घराच्या मागील दारी जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळला, ज्यामुळे खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संबंधित घरमालकासह दोघांना ताब्यात घेतलं असून, सखोल चौकशी सुरू आहे.

या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

Goa Crime
Goa Education: प्राण्यांच्या चामड्यापासून तयार बूट धोकादायक, शाळेत फक्त कॅनव्हास बूटच वापरा; गोवा शिक्षण खात्याचा आदेश

या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळं लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुलीचा मृतदेह ज्या घरात आढळला, पोलिसांनी त्या घराच्या मालकालासह दोघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com