Goa Murder Case: भंगार गोळा करणाऱ्या बेळगावच्या व्यक्तीचा गोव्यात खून; GMC बाहेर आढळला मृतदेह

Belgaum Man Murder Case: संतोष उदरनिर्वाहासाठी भंगार गोळा करण्याचे काम करायचा. दरम्यान, बुधवारी अचानक त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
Goa Murder Case
Goa murderDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बेळगावच्या ५० वर्षीय व्यक्तीचा गोव्यात खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा व्यक्ती भंगार गोळा करुन त्याचा उदरनिर्वाह करत असे. बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेरील बंद दुकानांजवळ रविवारी (१३ एप्रिल) हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली. याप्रकरणी आगशी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला आहे.

संतोष कांबळी (वय ५०, मूळ रा. बेळगाव) असे खून झालेल्या या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी संतोषचा मृतदेह बांबोळीत गोमेकॉच्या बाहेरील बंद दुकानांजवळ आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेहावर विविध ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत. आगशी पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद केला असून, या प्रकरणाचा सर्व अँगलनी तपास केला जात आहे.

Goa Murder Case
Illegal IPL Betting: बाणावलीत फ्लॅटमध्ये सुरू होती IPL बेटींग; पोलिसांकडून दोघांना अटक, 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, संतोष उदरनिर्वाहासाठी भंगार गोळा करण्याचे काम करायचा. दरम्यान, रविवारी अचानक त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. पोलिस, फॉरेन्सिक पथक, डॉग स्कॉडने घटनास्थळी दाखल होत आवश्यक सर्व पुरावे गोळा केले आहेत. संतोषसोबत अन्य काही लोक देखील होते, असा दावा काही प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करतायेत.

दोन दिवसांत दोन संशयास्पद मृत्यूच्या घटना

राज्यात दोन दिवसांत संशयास्पद मृत्यूच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. मंगळवारी सत्तरीत २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली. याप्रकरणात देखील खुनाचा संशय व्यक्त केला जात असून, या दृष्टीकोनातून पोलिस तपास करतायेत. तसेच, बांबोळीत देखील संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com