Goa Crime: ग्रॅनाईट व्यावसायिकाला दगडाने मारहाण करणारे चौघांना अटक

Goa Crime: म्हापसात संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: कामरखाजन-म्हापसा येथे मार्बल ग्रॅनाईटस् व्यावसायिकाला दगडाने मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित रावजी तुयेकर याच्‍यासमवेत चौघांना अटक केली. ही घटना काल शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

फिर्यादी आनंद व्यास यांचे कामरखाजन कनक ग्रॅनाईटस् हे मार्बल ग्रॅनाईटसचे आस्थापन आहे. या आस्थापनाच्या शेजारीच संशयित रावजी तुयेकर यांची शेतजमीन आहे. सदर जमिनीसह फिर्यादीच्या मालमत्तेत संशयितांनी मातीचा भराव टाकून ती बुजविण्याचा प्रयत्न केला होता.

Goa Crime
Zilla Panchayat Election: दवर्लीतून अपक्षाची माघार; एकूण 15 उमेदवार रिंगणात

शुक्रवारी संध्याकाळी फिर्यादी आपल्या पत्नीसह आस्थापनात होते. त्यावेळी संशयित आरोपी रावजी तुयेकर, त्याचा मुलगा दत्तराज तुयेकर, पत्नी रेश्मा तुयेकर, तसेच रोशन मांद्रेकर, मोहम्मद हलगेरी, अरमान, मलीक व डेल्टन यांनी व्यास यांच्या मालमत्तेत घुसखोरी केली. तसेच त्यांना दगडांनी मारहाण केली.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनाही संशयितांनी शिवीगाळ करत धमकी दिली. पोलिसांनी संशयित रावजी तुयेकर व मोहम्मद हलगेरी (काणकाबांध) या दोघांना काल संध्याकाळीच तर अरमान शेख (राजवाडा-म्हापसा) व मलीक महम्मद रफीक बाबा (वेर्ला) या दोघांना काल अटक केली.

Goa Crime
Goa Government: नगराध्यक्षपद तुमच्याकडेच ठेवा; पण कायदाबदल नको!

संशयित रावजी तुयेकर व मोहम्मद हिलगेरी या दोघांना येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठीड सुनावली आहे. संशयितांविरोधात भारतीय दंड संहितेच्‍या 143, 147, 148, 447, 341, 504, 427, 326, 506(2), 353व 149 कलमांखाली गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आशिष परब करत आहेत.

कारची मोडतोड; जीवे मारण्‍याची धमकी

संशयितांच्या तावडीतून सुटका करून फिर्यादी पत्नीसह आपल्या कारमध्ये बसले. त्यांच्या कारसभोवती संशयितांनी गराडा घातला. फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि कारची मोडतोड केली. या हल्ल्यात व्यास यांच्या डोक्याला जखम झाली. शिवाय कारचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com