Goa Crime: कोकण रेल्वे पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक! 17.22 लाखांचा चोरीचा ऐवज जप्त

Konkan Railway Arrest: या कारवाईत त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोनसह अंदाजे १७.२२ लाख किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
Konkan railway police
Konkan railway policeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: कोकण रेल्वे पोलिस स्टेशन, मडगाव आणि रेल्वे संरक्षण दल (RPF) यांच्या संयुक्त कारवाईत अनेक चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर रोजी केलेल्या या कारवाईत त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोनसह अंदाजे १७.२२ लाख किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीची ओळख साहिल कक्केरी (वय २५, रा. दांडेली, कर्नाटक) अशी झाली आहे. मडगाव रेल्वे स्टेशनजवळ चोरीचा माल विकण्याच्या प्रयत्नात असताना सोमवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई डोंबिवली, महाराष्ट्र येथील श्रिया बंगारा यांच्या तक्रारीवरून करण्यात आलेल्या तपासानंतर करण्यात आली आहे.

जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपीचा पळ काढण्याचा प्रयत्न

आरोपीकडून जप्त केलेल्या मालामध्ये १६०.३८ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्यांची किंमत १५.९७ लाख इतकी आहे. यात सोन्याचा मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या, कानातले, ब्रेसलेट आणि कडा यांचा समावेश आहे. तसेच, १.२५ लाख किमतीचे तीन मोबाईल फोन देखील हस्तगत करण्यात आले आहेत, ज्यामुळे एकूण मुद्देमालाची किंमत १७.२२ लाख झाली आहे.

Konkan railway police
Goa Crime: भाडयाची फॉर्च्युनर, जंगलात बदलली नंबरप्लेट, आलिशान गाड्या चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; 2 परप्रांतीयांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल कक्केरीने दिल्लीला पळून जाण्याची योजना आखली होती आणि त्यासाठी २९ सप्टेंबरची ट्रेनची तिकीटही खरेदी केली होती, पण तो ट्रेन पकडण्यात अपयशी ठरला. त्यानंतर त्याच रात्री त्याला चोरीच्या मालासह अटक करण्यात आली.

कोकण रेल्वे पोलिसांचे यश

मागील तीन महिन्यांत कोकण रेल्वे पोलिसांनी ९ चोरीच्या घटनांचा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या काळात पोलिसांनी सुमारे ३५ लाख किमतीचे सोने जप्त केले असून, ४ सराईत आरोपींना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com