Crime News |Goa News
Crime News |Goa NewsDainik Gomantak

Goa Crime News: ऐवज पळवून चोरी करणाऱ्या दोघांना अटक

चोरी केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी दोघांना आज अटक
Published on

Goa Crime News: नोव्हेंबर रोजी कोलवा येथील एका मोटारीतून ऐवज पळवून चोरी केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी दोघांना आज अटक केली. हाउसिंग बोर्ड-मडगाव येथील 35 वर्षीय वासीम सय्यद व फातोर्डा येथील 37 वर्षीय यासीन शेख अशी पकडलेल्या चोरांची नावे आहेत. कोलवा पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

Crime News |Goa News
Goa Politics News: बाबू आजगावकर अजूनही उपमुख्यमंत्री? 'खरी कुजबुज'

शापोरा नदीमध्ये सापडला मृतदेह

रेवोडा येथील शापोरा नदीपात्रात शुक्रवारी रात्री उशिरा अंदाजे 40 वर्षे वय असलेल्या अज्ञाताचा मृतदेह सापडला. कोलवाळ पोलिस स्थानकात बेपत्ता झाल्याची कुणी तक्रार केली नसल्याने मृतदेह पंचनामा करून गोमेकॉच्या शवागारात ठेवला आहे.

मात्र, शवचिकित्सा केलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. हा इसम नदीत बुडाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com