Goa Crime: गुन्हेगारीविरुद्ध आमदार विजय सरदेसाईंनी सुचवला मुख्यमंत्र्यांना चारसूत्री उपाय

मुख्यमंत्र्यांकडून कडक अंमलबजावणी अपेक्षित
Vijai Sardesai
Vijai Sardesai Dainik Gomantak

Goa Crime गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज गोव्यात वाढलेल्या गुन्हेगारीबद्दल कडक शब्दात समाचार घेऊन गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे सांगितले. मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आपल्या कारकिर्दीत गोव्यात गुन्हेगारी का वाढली? पुनरावलोकन किंवा आढावा बैठका कधी घेतल्या? काय उपाय घेतले आहेत का? यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करणे गरजेचे आहे.

जर यातील काहीही केले नसेल, तर सर्वप्रथम परप्रांतीय जिथे राहतात तिथे कडक पाळत ठेवणे, गस्ती घालणे, जे दादागिरी करतात त्यांना कडक शब्दांत समज देणे किंवा अटक करणे.

दुसरी सूचना पोलिस गुप्तचर दर्जा वाढविणे, तिसरी सूचना असुरक्षित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरविणे व चौथी सूचना म्हणजे बाराही तालुक्यात महिला पोलिस चौक्या सुरू करणे अशा चारसूत्री कार्यक्रमाची मुख्यमंत्र्यांनी अमलबजावणी करावी, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Vijai Sardesai
IIT Projects At Sanguem: आयआयटीच्या कामाला तीन महिन्यांत होणार सुरवात; सांगे तालुक्यात जागा निश्चित होण्याची शक्यता

‘पोलिसांचे व्यापक धोरण हवे’

सध्या जी गुन्हागारी वाढली आहे, त्यासाठी पोलिसांकडे व्यापक धोरण काय आहे हे लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. गोव्यात गुन्हेगारी घटनांची जास्त प्रमाणात नोंद होत आहे हे त्याला उत्तर नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली.

पोलिसांनी केवळ महसूल वाढीवर लक्ष न देता गुन्हेगारी थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com