Goa Crime: रात्री होते सोबत, सकाळी पत्नी सापडली मृतावस्थेत; 12 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात पतीला आधी कारावास, नंतर निर्दोष मुक्तता

Bicholim wife murder case: डिचोली येथे २०१३ मध्ये पत्नीची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेल्या मनोहर केतकर (५५) याची शिक्षा गोवा खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली.
Court Order
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: डिचोली येथे २०१३ मध्ये पत्नीची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेल्या मनोहर केतकर (५५) याची शिक्षा गोवा खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली.

गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याने तसेच सादर केलेले पुरावे अपूर्ण असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा निवाडा दिला. न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट व न्यायमूर्ती वल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठाने म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ऑगस्ट २०२४ मध्ये दिलेला दोषसिद्धीचा निर्णय रद्द केला.

Court Order
Tragic Death: कार कोसळली कालव्यात, युवक गेला वाहून; अस्नोडा येथे दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू Watch Video

१८ नोव्हेंबर २०१३ रोजी लाडफे (डिचोली) येथील नेस्ले कारखान्याजवळील शेडमध्ये मनिषा केतकर मृतावस्थेत आढळली होती. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण ‘गळा दाबून झालेली गुदमरल्याची स्थिती’ असे नमूद करण्यात आले होते. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता.

Court Order
Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

१७ नोव्हेंबरच्या रात्री मनोहर व मनिषा एकत्र होते, हे मान्य असले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे एकत्र बाहेर पडले, याबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मनिषाने कुटुंबीयांना ‘नोकरीसाठी आरोपीने बोलावले’ असे सांगितल्याचा उल्लेखही न्यायालयाने ऐकीव ठरवत फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com