Goa Crime News: गोव्यात मनोरुग्‍ण युवतीला बेदम मारहाण

Goa Crime News: कुंभारजुवेत एका मनोरुग्ण युवतीला मुले पळविणारी समजून काल बेदम मारहाण करण्यात आली.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: कुंभारजुवे येथे एका मनोरुग्ण युवतीला मुले पळविणारी समजून काल बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ती मनोरुग्ण असल्याचे उघडकीस आले. सध्‍या जखमी अवस्थेत तिला बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दरम्‍यान, या मारहाणप्रकरणी जुने गोवे पाेलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. (Goa Crime News)

राज्यात मुले पळविणारी टोळी वावरत असल्‍याच्‍या चर्चेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मार्केट किंवा शाळेच्या आवारात संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तींना पकडून त्यांची विचारपूस करताना संशय आल्यास कोणतीही शहानिशा न करता किंवा पोलिसांच्या ताब्यात न देता मारहाण करण्याची पद्धत लोकांनी अवलंबिली आहे. असाच प्रकार आज कुंभारजुवेत घडला.

Goa Crime News
Goan News: तोतया पर्यटक गाईडकडून फसवणूक; पर्यटन खात्याची चालढकल!

घटनेची माहिती जुने गोवे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तिला स्थानकात आणून चौकशी केली असता तिच्‍याकडे मनोरुग्ण असल्याचे कार्ड सापडले. तिच्या कुटुंबीयांशी पोलिसानी संपर्क साधला. ती मनोरुग्ण असल्याचे कुटुंबीयांनी सांगितल्यावर उपचारांसाठी तिला दाखल करण्यात आले.

दरम्यान, पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार मारहाण करण्यात आलेली युवती ही मुले पळविणाऱ्या टोळीतील नसून ती मनोरुग्ण आहे. त्यामुळे व्‍हॉटस्-अ‍ॅपवरून या युवतीबाबत मुले पळविणारी असल्याचा जो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे तो चुकीचा आहे.

त्यामुळे लोकांनी अशा व्हिडिओपासून सावध रहावे. कायदा हातात घेऊ नये. तसेच कोणाचीही हालचाल संशयास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधवा असे आवाहन केले आहे.

Goa Crime News
Goa Municipality: कंत्राटावरील चतुर्थश्रेणीतील 170 कामगार कायम होणार!

दोरीने हात बांधून चोपले

सदर युवती माशेल येथे कुटुंबासमवेत राहत असून मनोरुग्ण आहे. तिच्यावर मनोरुग्ण इस्पितळात उपचार सुरू आहेत. काल रात्री ती घरातून बाहेर पडली ती आज सकाळी कुंभारजुवे येथे एकटीच फिरत होती. तेथील काही लोकांनी तिला संशयास्पद वागणुकीवरून पकडले.

तसेच, तिची चौकशी केली असता ती उत्तर देत नव्हती. ती मुले पळविणाऱ्या टोळीतील असावी असा अंदाज व्‍यक्त करुन काही महिलांनी तिचे हात दोरीने बांधले. किती मुले पळविली? आणखी कोण बरोबर आहेत? अशा प्रश्‍नांचा भडिमार जमावाने केला. ती मनोरुग्ण असल्याने ‘हो’ असे उत्तर देत गेली. त्यामुळे जमावाने तिला बेदम मारहाण केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com