Goa Crematorium Issue: पारोडा पंचायत क्षेत्रातील स्मशानभूमीचा वाद उफाळला; संतप्त गावकरी पोलीस ठाण्यात दाखल

Goa Crematorium Issue : स्मशानभूमीला कुंपण घालण्यासाठी सर्व्हे करून सिमेंटचे पोल लावले होते परंतु काही दिवसांनी अज्ञात व्यक्तीने ते सर्व पोल काढून टाकले
Goa Crematorium Issue
Goa Crematorium IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crematorium Issue : काही दिवसांपूर्वी पेडणे येथील स्मशानभूमीत पाणी, विजेची समस्या निर्माण झाल्याने वाद उफाळून आला होता. असेच काहीसे प्रकरण दक्षिण गोव्यातील तळ्यावाडी गुढी पारोडा परिसरातील स्मशानभूमीबाबत घडले आहे.

येथील गावकऱ्यांनी त्यांच्या स्मशानभूमीला कुंपण घालण्यासाठी सर्व्हे करून सिमेंटचे पोल पुरले होते परंतु काही दिवसांनी अज्ञात व्यक्तीने ते सर्व पोल काढून टाकले होते.

Goa Crematorium Issue
Panaji News : 5922 खासगी हॉटेल्सची ‘पर्यटन’कडे नोंदणी; पर्यटन उपसंचालक राजेश काळे

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा गावकऱ्यांनी श्रमदानातून पोल लावल्यावर परतही पोल उखडून टाकण्याचा प्रकार घडला होता. यावेळी गावकऱ्यांनी जिमी लॉड्रिगिस या इसमाला पोल हटवताना पाहिले.

याप्रकरणी तळ्यावाडी गुढी पारोडा गावच्या सरपंच राजश्री गावकर यांनी फोनवरून जिमी लॉड्रिगिस याला जाब विचारला असता त्याने थेट सरपंचांवर धमकी दिल्याचीच केस दाखल केली.

या प्रकरणी रविवारी गावकरी सरपंचाच्या पाठिंब्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून जिमी लॉड्रिगिसविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार सदर स्मशानभूमी ही SC-ST समाजाची असून सरपंचांच्या वकिलांनी ऍट्रॉसिटी अंतर्गत केस दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com