Panaji News : पणजी, राज्य सरकारला भरघोस महसूल मिळत असल्याने पर्यटन विभागाकडून खासगी हॉटेलच्या नोंदणीवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जात आहे. अनधिकृत हॉटेल आस्थापनांवर पर्यटन खात्याकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
मार्च २०२३ पर्यंत पर्यटन विभागाकडे एकूण ५९२२ खासगी हॉटेल्सची नोंदणी झाली आहे,अशी माहिती पर्यटन उपसंचालक राजेश काळे यांनी दिली.
गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. गोव्यात आलेले अनेक पर्यटक गोव्यात हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये काही दिवस मुक्काम करतात.
हा निकष लक्षात घेऊन पर्यटन विभागाने खासगी हॉटेल्सना पर्यटन विभागाकडे नोंदणी करून शुल्क भरणे बंधनकारक केले आहे. काळे यांनी सांगितले, की, खासगी हॉटेल्सनी पर्यटन विभागाकडे 'गोवा नोंदणी पर्यटन व्यापार कायदा, १९८२ आणि नियम, १९८४' अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोणतेही खासगी हॉटेल विभागाकडे नोंदणीकृत नसल्याचे आढळून आल्यास त्या हॉटेलला मोठा दंड आकारण्यात येतो.
हॉटेल्सची ४ श्रेणींमध्ये विभागणी
हॉटेल्सच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशा चार श्रेणींमध्ये हॉटेल्सची विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ श्रेणीमध्ये ९८९६ खोल्या आणि १६१९१ बेडची ८५ हॉटेल्स आहेत. ‘ब’ श्रेणीमध्ये १२४६१ खोल्या आणि १९७२९ बेडची २६९ हॉटेल्स आहेत.
‘क’ श्रेणीमध्ये, २७७२१ खोल्या आणि ४३९४९ बेड असलेली २४५६ हॉटेल्स आहेत. श्रेणी ‘ड’ मध्ये, १०१६६ खोल्या आणि १५९८४ बेड असलेली ३११२ हॉटेल्स आहेत. मार्च २०२३ पर्यंत पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत एकूण ६०२४४ खोल्या आणि एकूण ९५८५३ खाटांची एकूण ५९२२ हॉटेल्स आहेत,असे राजेश काळे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.