Goa Drug Case: पणजी अमलीपदार्थ प्रकरण; संशयिताचा 'डिफॉल्ट' जामीन अर्ज फेटाळला, रासायनिक अहवालावरून कोर्टात खल

Goa Cocaine Seizure Case: संशयिताच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, पोलिसांनी २ एप्रिल २०२६ रोजी दाखल केलेले आरोपपत्र अपूर्ण आहे
Goa Cocaine Seizure Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजीतील एका मोठ्या अमलीपदार्थ जप्ती प्रकरणात अमलीपदार्थ विरोधी पथकाने अटक केलेला संशयित नायजेरियन नागरिक चिगोझी इनोसेंट याने सादर केलेला ‘डिफॉल्ट’ जामीन अर्ज मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. चिगोझी इनोसेंट याला अमलीपदार्थ विरोधी पथकाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी एका घरातून ११६२.३ ग्रॅम कोकेन आणि १०६.२ ग्रॅम एक्स्टसी पावडरसह ‘एनडीपीएस’ कायद्याअंतर्गत अटक केली होती.

संशयिताच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, पोलिसांनी २ एप्रिल २०२६ रोजी दाखल केलेले आरोपपत्र अपूर्ण आहे; कारण त्यात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा रासायनिक विश्लेषण अहवाल जोडलेला नाही. एनडीपीएस नियम २००० च्या नियम १४ नुसार, नमुने मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत प्रयोगशाळेचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.

Goa Cocaine Seizure Case
Goa Sessions Court: कनिष्ठ न्यायालयाचा 'तो' निर्णय तर्कहीन; कारावासाची शिक्षा केली रद्द, रवींद्रनाथ गावकर दोषमुक्त

आरोपपत्रात रासायनिक अहवाल नसल्यामुळे संशयिताला डिफॉल्ट जामीन मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे, असा दावा त्यांनी काही न्यायालयीन निवाड्यांचा हवाला देत केला. सरकारी पक्षाने या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. त्यांनी सांगितले की, रासायनिक अहवालाशिवाय दाखल केलेले आरोपपत्र ‘अपूर्ण’ मानायचे की नाही, हा मुख्य मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे.

‘एनडीपीएस’ नियमांमध्ये कुठेही असे म्हटलेले नाही की, रासायनिक अहवाल वेळेत न आल्यास संशयिताला थेट डिफॉल्ट जामीन दिला जावा. छाप्यात जप्त केलेले अमलीपदार्थ व्यावसायिक प्रमाणात असल्यामुळे ‘एनडीपीएस’ कायद्याचे कडक कलम ३७ लागू होते. तसेच, प्राथमिक चाचणीत अमलीपदार्थांची पुष्टी झालेली आहे.

Goa Cocaine Seizure Case
Goa High Court: ‘खुली सुधारसंस्था’ सुरू करा! न्यायालयाचे सरकारला निर्देश; पुढील सुनावणी जूनमध्ये

असे आरोपपत्र अपूर्ण मानले जाऊ शकत नाही!

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, अतिरिक्त सत्र न्यायालायने अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले की, या प्रकरणात संशयिताविरुद्ध आधीच आरोप निश्चित करण्यात आले आहेत, ज्यावरून प्रथमदर्शनी सबळ पुरावे असल्याचे स्पष्ट होते. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ‘मानस टी.के. विरुद्ध राज्य’ या खटल्यात यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, रासायनिक अहवालाशिवाय दाखल केलेले आरोपपत्र अपूर्ण मानले जाऊ शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com