Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

umakant khot death case morjim: मोरजी येथील ६३ वर्षीय उमाकांत खोत यांच्या मृत्यू प्रकरणात मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन आरोपींना दिलासा दिला आहे.
umakant khot death case morjim
courtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मोरजी येथील ६३ वर्षीय उमाकांत खोत यांच्या मृत्यू प्रकरणात मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन आरोपींना दिलासा दिला आहे. आरोप निश्चितीच्या टप्प्यावर पुरावे अपुरे असल्याने लोकेश पुट्टास्वामी, रोहित कुमार प्रजापती आणि विजी सुप्पन यांची न्यायालयाने मुक्तता केली.

न्यायमूर्ती शिल्पा पंडित यांनी स्पष्ट केले की, या तिघांचा खोत यांच्या मृत्यूशी थेट संबंध दर्शविणारा कोणताही प्रत्यक्ष पुरावा किंवा साक्ष उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यास पुरेसा आधार नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोककुमार नेदुरुमली हा बेपत्ता असून कोर्टाने (Court) त्‍याला फरार घोषित केले आहे.

umakant khot death case morjim
Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

तपासाचा केंद्रबिंदू अशोककुमारवर

मांद्रे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली होती. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर आता तपासाचा केंद्रबिंदू फरार आरोपी अशोककुमार नेदुरुमली याच्यावर राहणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nitesh Rane Acquitted
Goa High Court Minor Child
Lavu Mamledar Death Case
Goa Sessions Court Verdict
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com