Goa Court: दाबोळी विमानतळावरून ओमानमध्ये चरस तस्करीचा प्रयत्न करणाऱ्यास 10 वर्षांचा तुरूंगवास

1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला
Goa Court:
Goa Court: Dainik Gomantak

Dabolim Airport: ओमान या देशात जाण्यासाठी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून साडे तीन किलो चरस वाहून नेण्याचा प्रयत्न करताना पकडलेल्या शरीफ शेख या पाळी डिचोली या आरोपीला दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी दोषी ठरवून 10 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली.

या शिवाय या आरोपीला 1 लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला असून हा दंड एन भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त कैद सुनावण्यात आली आहे.

Goa Court:
Goa Students Eye Defects: राज्यातील 8 टक्के विद्यार्थ्यांना दृष्टीदोष; सरकारी तपासणीतून समोर आली बाब

या आरोपीवरील गुन्हा विशेष सरकारी वकील प्रियश मडकईकर यांनी सात साक्षीदारांना न्यायालयासमोर पेश करून सिद्ध केला. नार्कोटिक कंट्रोल ब्यूरोचे तपास अधिकारी हरकेश यांनी या प्रकरणी संपूर्ण तपास केला होता.

14 जानेवारी 2019 रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. दाबोळीहून ओमानला जात असताना आंतरराष्ट्रीय विभागात त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात चरस असलेली 10 पाकिटे लपवून ठेवल्याचे सापडून आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com