Goa: पूर्ण लसीकरण केलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा: विश्वजित राणे

आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajeet Rane) यांच्या हस्ते डिचोलीत (Bicholim) 147 "कोविड" वॉरियर्सांचा सन्मान करण्यात आला.
कोविड योध्यांच्या सत्कार समारंभ
कोविड योध्यांच्या सत्कार समारंभDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: 'कोविड' महामारी (Covid-19) नियंत्रणात आणण्यासाठी सरकाराबरोबरच आरोग्य खाते चांगली कामगिरी करीत आहे. महामारीचे संकट पूर्णपणे दूर करायचे असल्यास, पूर्ण लसीकरण केलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा. असे मत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केले. येथील हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहात शुक्रवारी सायंकाळी आयोजित "कोविड वॉरियर्स" सन्मान सोहळ्यात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. (Goa Health Minister Vishwajit Rane has said that only those who have been fully vaccinated should be allowed to enter the state)

आरोग्य खात्याचे डॉक्टर्स, परिचारिका आदी कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता करीत असलेल्या सेवेमुळेच गोव्यातील महामारीची स्थिती सुधारत आहे. त्यामुळेच हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. याकामी पोलिस आणि घटकांची कामगिरीही दुर्लक्षित करून चालणार नाही. असे यावेळी बोलताना मंत्री श्री. राणे यांनी सांगून, डिचोलीतील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी सामाजिक आरोग्य केंद्रात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशे आश्वासन दिले.

यावेळी डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर अध्यक्षस्थानी उपस्थित होते. अन्य मान्यवरात नगराध्यक्ष कुंदन फळारी, आरोग्य खात्याची उपसंचालक डॉ. सियोना, डॉ. राजेंद्र बोरकर, डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राची आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर आणि डॉ. शेखर साळकर यांची उपस्थिती होती.

कोविड योध्यांच्या सत्कार समारंभ
Goa: CZMP सुनावणी एकाच दिवसात संपविल्याबद्दल नागरीकांमध्ये नाराजी

'कोविड' महामारी नियंत्रणात येण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे अथक प्रयत्न करीत आहेतच. त्याहूनही डॉक्टर्स आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत. ही सेवा महान असून, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. असे सभापती श्री. पाटणेकर बोलताना म्हणाले. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राने आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्यात डॉक्टर्स मिळून 147 जणांचा आरोग्य मंत्री श्री. राणे, सभापती पाटणेकर आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. साळकर यांनी स्वागत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com