मडगावात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या गेली 211 वर..

पुन्हा लॉकडाऊन तर होणार नाही ना या भीतीने व्यापाऱ्यांना ग्रासले
Goa Corona Update

Goa Corona Update

Dainikgomantak

फातोर्डा: गोव्याची सर्वात मोठी आर्थिक उलाढाल जिथे होते त्या मडगावात पुन्हा कोविडचे रुग्ण वाढल्याने (Goa Corona Update) मडगावातील व्यपाऱ्यांची पुन्हा लॉकडाउन होण्याच्या भीतीने चिंता वाढली आहे. रविवारी मडगावतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 211 झाली असून शनिवारी ही संख्या 166 होती. एकाच दिवसात 45 रुग्ण वाढले असून गोव्यात सर्वात अधिक रुग्ण सध्या मडगावात आढळून आले आहेत.

<div class="paragraphs"><p>Goa Corona Update</p></div>
रशियन नागरिकाला अंमली पदार्थांसह अटक..

कोरोनाच्या (Corona) पहिल्या टप्य्यात मडगाव न्यू मार्केट परिसरातील तसेच बार आणि रेस्टारंट , हॉटेल्स , न्हाव्यांची दुकाने दीड ते दोन महिन्यापर्यंत सलग बंद राहिली होती आणि येथील व्यवसायिकांना नुकसान सोसावे लागले होते. आता पुन्हा नव्या संसर्गाचा प्रसार होत असल्याने येथील दुकाने दुसऱ्यांदा बंद ठेवण्याची पाळी तर येणार नाही ना या चिंतेत येथील दुकानदार आहेत.

मार्च 2020 मध्ये देशव्यापी 21 दिवसांचा लॉकडाउन (LockDown) झल्यानंतरही राज्य शासनाने राज्यात संसर्ग वाढत असल्याने पुढील काही दिवसासाठी लॉक डाउन घोषित केला होता. कोरोनाच्या या पहिल्या टप्प्यात न्यू मार्केट मधील दुकाने अनेक दिवसासाठी बंद होती .

हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर न्यू मार्केट परिसरात दुकाने दाटीवाटीने असल्याने एक दिवस पांढरी आणि दुसऱ्या दिवशी पिवळी रेषेची दुकाने खुली करण्यात येत होती . हा काळ दोन ते तीन महिन्यासाठी होता. त्यामुळे येथील दुकाने तीन ते चार महिन्याच्या काळासाठी बंद राहिली होती .

<div class="paragraphs"><p>Goa Corona Update</p></div>
शैक्षणिक संस्था बंद करा; ऑनलाइन वर्ग सुरू करा: NSUI

या विषयावर बोलताना मडगाव (Margao) न्यू मार्केट वयापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी सांगितले कि मनोरंजनाचे होणार कार्यक्रम कोरोना संसर्गाच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे व्यपारी वर्गाला फटका बसत आहे . मागील वेळी येथील दुकाने बंद ठेवली लागली होती आणि दुकानदारांना नुकसान सोसावे लागले होते . दुकानदारांना झालेल्या नुकसानाची परतफेड सरकारने केली नाही . मात्र या पुढे आमची दुकाने बंद ठेवण्यात येणार नाही . जर अशी पाळी आली तर सरकारकडे आम्ही नुकसान भरपाई मागणार आहोत.

येथील खाध्य पदार्थ विक्रीशी निगडित असलेल्या एका दुकानदाराने सांगितले कि मार्च २०२० नंतर आमचा व्यवसाय पूर्ण पणे ठप्प पडला होता. यावेळी खाध्य पदार्थ नासत असल्याने आणि जास्त दिवस टिकत नसल्याने असलेला सर्व माल बाहेर फेकून द्यावा लागला होता . हा काळ चार ते पाच महिन्यापर्यंत होता . तेव्हा झालेल्या नुकसानाची भरपाई अजून पर्यंत झाली नाही आणखी पुन्हा लॉक डाउन करावे लागले तर आमच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे. मागील वेळी सरकारनेही काही मदत केली नव्हती . अशाने आमचे जगणे मुश्किल होणार आहे.

न्हाव्याचा व्यवसाय चालविणारे एस. चव्हाण बोलताना म्हणाला सहा महिने दुकान बंद ठेवावे लागले होते . व या दिवसात उपास्मारित दिवस काढावे लागले होते. काही ठिकाना कडून उधारीने जीवनावश्यकयवस्तूंचे सामान घेऊन कुटुंबाचा खर्च चालविला होता . पुन्हा तशी वेळ न येण्याची देवाकडे प्रार्थना करीत आहे असे तो म्हणाला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com