शैक्षणिक संस्था बंद करा; ऑनलाइन वर्ग सुरू करा: NSUI

“कोविडचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा ऑनलाइन वर्ग सुरू करावेत. तसेच परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात
NSUI President of Goa Naushad Chowdhari statment 

NSUI President of Goa Naushad Chowdhari statment 

Dainik Gomantak

Published on
Updated on

पणजी: NSUI गोवाचे प्रदेशाध्यक्ष नौशाद चौधरी यांनी महाराष्ट्रातील ओमिक्रॉनच्या वाढते प्रकरणे बघता, शैक्षणिक संस्था बंद करण्यात आणि कोविड (Goa Corona Update) नियंत्रित ठेवण्यात तसेच निर्बंध लागू करण्यात अपयशी ठरल्यास भाजप सरकारला संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला आहे. “कोविडचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा ऑनलाइन वर्ग सुरू करावेत. तसेच परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात. सोमवारपासून महाविद्यालये सुरू होत आहेत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा.”असे मत चौधरी यांनी मांडले.

<div class="paragraphs"><p>NSUI President of Goa Naushad Chowdhari statment&nbsp;</p></div>
बाबू आजगावकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा !

चौधरी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही तिसरी लाट अत्यंत धोकादायक आहे. "ओमिक्रॉन (Omicron Variant) हे डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक प्रसारित करत आहे. तथापि, गोवा सरकारने कोविड रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही.” असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) कोविडवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. "गेल्या कोविड दरम्यान ते त्यांच्या राजकीय सभांमध्ये व्यस्त होते आणि आता निवडणुकीत व्यस्त आहेत, भाजपच्या (BJP) गैरव्यवस्थापनामुळे लोकांना धोका निर्माण होत आहे." असे आरोप त्यांनी भाजपवर लावले. दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी “जीनोम सिक्वेन्सिंग मशीनची गरज असून ते उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. हे मशीन गोव्यात उपलब्ध नाही. त्यामुळे नमुने पुण्याला पाठवले जातात, त्यांचा अहवाल येण्यास वेळ लागतो.”

पुढे भाजप वर टोला लगावत त्यांनी ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात नोंदली गेली आहेत. “हे आमचे शेजारी राज्य आहे. असे असूनही सरकार देशांतर्गत पर्यटकांची चाचणी घेत नाही. चेकपोस्टवर 100 रुपये घेऊन पर्यटकांना परवानगी दिली जाते. कोविड चाचणी होत नाही.” असे आरोप केले.

नुकतेच एनएसयूआयने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. “असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांची चाचणी सकारात्मक (Corona Positive Case) झाली आहे, जर ते वर्गात गेले तर ते इतर विद्यार्थ्यांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो असे म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com