Amit Patkar: अमित पाटकरांच्या खांद्यावर गोवा काँग्रेसची धुरा! गोमंतकीयांच्या प्रश्‍‍नांना प्राधान्‍य अन् वरिष्‍ठांचा विश्‍‍वास जपणार

Goa Congress: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या अमित पाटकर यांच्या पदाला धोका निर्माण झाल्याचे चित्र होते.
Amit Patkar: अमित पाटकरांच्या खांद्यावर गोवा काँग्रेसची धुरा! गोमंतकीयांच्या प्रश्‍‍नांना प्राधान्‍य अन् वरिष्‍ठांचा विश्‍‍वास जपणार
Amit PatkarDainik Gomanrtak
Published on
Updated on

पणजी: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या अमित पाटकर यांच्या पदाला धोका निर्माण झाल्याचे चित्र होते. परंतु राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्या अहवालानुसार काँग्रेसच्या श्रेष्ठींनी पाटकर यांच्यावरच विश्वास ठेवून पक्षाची पुनर्रचना करण्याची सर्व जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेस (Congress) पक्षाने नेहमीच सामान्‍यांचे प्रश्‍‍न हाताळले आहेत. यापुढेही हा पक्ष वेगाने पुढे जाईल, अशी निःसंदिग्ध ग्‍वाही प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी दिली. राष्‍ट्रीय पातळीवरून त्‍यांच्‍यावर विश्‍‍वास अधिक दृढ झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाटकर बोलत होते. काही दिवसांपूर्वीच वरिष्‍ठांनी गोव्‍यातील स्‍थितीचा आढावा घेतला होता.

Amit Patkar: अमित पाटकरांच्या खांद्यावर गोवा काँग्रेसची धुरा! गोमंतकीयांच्या प्रश्‍‍नांना प्राधान्‍य अन् वरिष्‍ठांचा विश्‍‍वास जपणार
Amit Patkar: संविधान बदलण्याचा भाजपचा डाव हाणून पाडा; पाटकरांचे तमाम भारतीयांना आवाहन!

एवढ्या छोट्या राज्यात काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या लाथाळ्या आणि कुरघोडी या डॉ. निंबाळकर यांनी प्रत्येकाची मते जाणून घेतल्यानंतर स्पष्टपणे दिसून आल्या होत्या. पाटकर यांच्या विरोधात एक गट सक्रियपणे कार्यरत आहे, अशीही अटकळ होती. काही आठवड्यांपूर्वी राज्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याला दिल्लीला पाटकरांच्या विरोधात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार करण्यास पाठविले होते. काही माजी आमदारांनी प्रदेशाध्यक्षपद मिळविण्यासाठी पडद्याआडून प्रयत्न सुरू केले होते.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर (Assembly Elections) पक्षाला अवकळा लागल्याचे चित्र होते, त्याशिवाय दुसऱ्या बाजूला आर्थिक तंगीमध्ये पक्ष अडकला असताना पक्षाच्या वरिष्ठांनी युवा नेते अमित पाटकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली आणि त्यांनी ती आजतागायत पेलली आहे. परंतु मध्यंतरी पक्षाच्या खर्चावरून अंतर्गत धुसफूस झाली आणि काही कार्यकर्त्यांवर कारवाई झाली.

Amit Patkar: अमित पाटकरांच्या खांद्यावर गोवा काँग्रेसची धुरा! गोमंतकीयांच्या प्रश्‍‍नांना प्राधान्‍य अन् वरिष्‍ठांचा विश्‍‍वास जपणार
Amit Patkar : संविधानामुळे भाजप आवाज दाबू शकणार नाही! अमित पाटकर यांचे टीकास्त्र; 'रक्षक अभियानाला' सुरुवात

ही कारवाई झाल्याने त्यांच्या समर्थकांनी सवतासुभा मांडला. अथर्गत वादातून एक गट त्यांच्याविरोधात अद्यापि कार्यरत आहे, पण तो गट उघडपणे विरोध दर्शवित नसला तरी कार्यक्रमांना व आंदोलनात सहभाग न दर्शवित आपला विरोध अप्रत्यक्षरित्या दाखवित आला आहे. परंतु आता पक्षाची पुनर्रचना करण्याची जबाबदारी पाटकरांवर वरिष्ठ नेत्यांनी टाकली असल्याने त्यांचे पद अजूनही मजबूत झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com