B Sudershan Reddy
B Sudershan ReddyDainik Gomantak

गोवा काँग्रेसने काळे झेंडे दाखवले, निषेध केला; त्याच सुदर्शन रेड्डींना इंडिया आघाडीने दिली उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी

B Sudershan Reddy: काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली असून, २१ ऑगस्ट ते अर्ज सादर करणार आहेत.
Published on

पणजी: जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. एनडीए आघाडीने यासाठी सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर, इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी घोषित केली आहे. याच सुदर्शन यांचा काँग्रेसने कधीकाळी काळे झेंडे दाखवून निषेध केला होता.

काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली असून, २१ ऑगस्ट ते अर्ज सादर करणार आहेत. पण, १२ वर्षापूर्वी काँग्रेसने याच सुदर्शन यांचा विरोध केला होता. गोष्ट आहे १६ मार्च २०१३ सालची यावेळी गोव्यात मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होते. यावेळी बी. सुदर्शन यांची राज्याचे पहिले लोकायुक्त म्हणून नेमणूक झाली होती. काँग्रेसने याचा कडाडून विरोध केला होता तसेच, सुदर्शन यांच्या शपथ कार्यक्रमात देखील सहभाग घेतला नव्हता

B Sudershan Reddy
Colvale: रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळली महिला पर्यटक, भाषेच्या अडचणीमुळे स्थानिकांशी संवाद कठीण; कोलवाळ हायवेवरील धक्कादायक प्रकार

२०१३ मध्ये मनोहर पर्रीकर सरकारने सुदर्शन रेड्डी यांची लोकायुक्तपदी नेमणूक केली होती. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्याचा विरोध केला होता. सुदर्शन यांना सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त होऊन दोन वर्षे झाली होती. दरम्यान, सुदर्शन यांच्या नियुक्तीला काँग्रेसने कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगत विरोध दर्शवला होता. सुदर्शन यांच्या शपथविधीपूर्वी काँग्रेस – राष्ट्रवादीने त्यांना काळे झेंडेही दाखवले होते.

B Sudershan Reddy
Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

सुदर्शन रेड्डी यांचा गोव्यातील लोकायुक्त म्हणून केवळ सात महिन्यांचा कार्यकाळ होता. यानंतर त्यांनी व्यक्तिगत कारण सांगत राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी राज्य आरोग्य विभागात भरतीतील अनियमितता आणि २००७ ते २०१२ दरम्यान राज्यातील अवैध खाण घोटाळ्याची चौकशीही त्यांच्या कार्यकाळात झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com