

भ्रष्ट जुमला पक्षाच्या गेल्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत न्यायव्यवस्थेसारख्या संस्था धोक्यात आल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मंगळवारी केला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यालयात पाटकर बोलत होते.
पंडित नेहरू हे आधुनिक भारताचे निर्माते होते, ज्यांनी देशाचा भक्कम पाया रचला, असे पाटकर म्हणाले.
“गेल्या ९ वर्षांच्या भ्रष्ट जुमला पक्षाच्या राजवटीत न्यायव्यवस्थेसारख्या संस्था धोक्यात आल्या आहेत. भारतात भयंकर परिस्थिती असून, त्यामुळे आपण आपल्या बंधुभावाचे रक्षण कसे करू शकतो, आपल्या देशाची प्रगती कशी करू शकतो याचा विचार करणे आवश्यक आहे.
“आपल्या देशात सुयाही बनत नव्हत्या. मात्र जवाहरलाल नेहरूंनी देशात उद्योग आणि संस्था आणून प्रगती केली. त्याच्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असे पाटकर म्हणाले.
जवाहरलाल नेहरूंची शिक्षण आणि अर्थशास्त्राबाबत दूरदृष्टी होती. लोकशाही, सामाजिक सबलीकरण आणि सामाजिक न्यायावर त्यांचा विश्वास होता, असे काँग्रेस आमदार कार्लोस फेरेरा म्हणाले.
"नेहरुंनी लंडनमध्ये शिक्षण घेतले आणि त्यांना बॅरिस्टर म्हणून संबोधले गेले, हीच एक गोष्ट होती ज्याने त्यांना योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. आज आपल्याला शिक्षण असलेल्या नेत्याची गरज आहे. तुमच्याकडे व्हिजन असेल तर तुम्ही एक रोडमॅप तयार करू शकता, ज्यामुळे देशाला दर्जेदार पायाभूत सुविधा, विकास आणि प्रगती मिळू शकेल. पंडित जवाहरलाल नेहरूंची हीच ओळख होती," असे कार्लोस म्हणाले.
"नेहरू हे परराष्ट्र धोरणातील एक दिग्गज नेते होते आणि आंतरराष्ट्रीय समुदायात त्यांचा खूप आदर होता. आपल्या देशातील तरुणांमध्ये चांगली मूल्ये रुजवण्याची आणि या मूल्यांचे अनुकरण करण्याची आणि आपल्या देशाला सकारात्मकतेने पुढे नेण्याची आणि देश विभाजित न होता एकसंध राहण्याची वेळ आली आहे," असे कार्लोस म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.