Goa Congress: हतबल काँग्रेसच्या बळकटीसाठी पाटकरांचा निर्धार

लुईझिन फालेरो यांना काँग्रेस प्रवेश नाही सहज सोपा : सार्दिन
Amit Patkar
Amit Patkardainik gomantak
Published on
Updated on

पणजी: आमदारांच्या घाऊक पक्षांतरानंतर हतबल आणि गलितगात्र झालेल्या काँग्रेसने आता पक्ष बळकटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गोवा काँग्रेसची (Goa Congress) नवी टीम गोमंतकीयांसाठी नवीन ऊर्जा आणि कल्पना घेऊन येईल, असा आत्मविश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर (Amit Patkar) यांनी व्यक्त केला.

पाटकर म्हणाले, मी सध्या काँग्रेसची संघटना स्थिर करण्यासाठी काम करत आहे. आमचे तिन्ही आमदार, दक्षिण गोव्याचे खासदार आणि पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या समन्वयाने काम करत आहेत. आम्ही संथ गतीने भविष्यासाठी राजकीय रणनीती आखत आहोत. संपूर्ण अभ्यास व विश्लेषण करूनच मार्गक्रमण करणार आहोत. धिसाडघाईने घेतलेले निर्णय हे पक्षाला मारक ठरतात याची आम्हाला जाणीव झाल्याचे पाटकरांनी म्हटले आहे.

Amit Patkar
Mavin Gudinho: गरबा व दांडिया स्पर्धेत मंत्री माविन गुदिन्हो यांनी धरला ठेका

लुईझिन फालेरो यांना काँग्रेस प्रवेश नाही सहज सोपा : सार्दिन

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीतील सदस्यांची आज मडगावात (Margao) बैठक झाली. पक्ष सोडलेल्यांना पक्षात परत घेण्यापूर्वी चर्चा करूनच निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले. त्याचबरोबर कोणत्याही पक्ष सोडलेल्या नेत्यांना परत पक्षात घेतले जाणार नाही, त्यात पूर्वीचे 10 आमदार व नंतरच्या आठ आमदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पक्ष सोडलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना पक्ष मजबूत करण्यासाठी परत पक्षात घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन (MP Francisco Sardinha) यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com