Mavin Gudinho: गरबा व दांडिया स्पर्धेत मंत्री माविन गुदिन्हो यांनी धरला ठेका

आश्चर्य स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने अखिल गोवा गरबा व दांडिया स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
Mavin Gudinho
Mavin GudinhoDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या सर्वदूर नवरात्रोत्सवाची धूम आहे. गरबा व दांडियाची खेळात अबालवृद्ध रमताना दिसत आहेत. वास्को (Vasco) नवे वाडे येथील आश्चर्य स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने अखिल गोवा गरबा व दांडिया स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेचे उद्धाटन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Mavin Gudinho) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांनी गरब्याच्या गाण्यांवर ठेका धरला.

Mavin Gudinho
Mavin GudinhoDainik Gomantak

नवेवार्ड येथील वाडेनगर इंग्लिश स्कूलसमोरच्या पटांगणवर सदर स्पर्धेचे आयोजन केले आहे. गरबा व दांडिया स्पर्धा 5 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. विजेत्यांना पहिले बक्षीस 50 हजार रुपये, दुसरे बक्षीस 30 हजार रुपये, तर तिसरे बक्षीस 20 हजार रुपयांचे देण्यात येणार आहे.

Mavin Gudinho
Crackdown On PFI In Goa: ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांची दक्षिण गोव्यात धरपकड

स्पर्धेला स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी गुदिन्हो यांच्यासह सरपंच संकल्प महाले, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर, नगरसेवक विनोद किनळेकर, भाजप दाबोळी मंडळ अध्यक्ष संदीप सूद व इतर मान्यवर उपस्थित होते. गुदिन्हो यांनी नागरिकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Mavin Gudinho
Mavin GudinhoDainik Gomantak

गुदिन्हो यांनी क्लबचे अध्यक्ष रोहन देसाई व इतरांचे कौतुक केले. सदर स्पर्धा होऊ नये यासाठी काहीजणांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले; परंतु ते यशस्वी झाले नाहीत. या शुभारंभानंतर गुदिन्हो हे गरबा नृत्यमध्ये सहभागी झाले. त्यांना सरपंच सकल्प महाले, विनोद किनळेकर व इतर यांनी साथ दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com