Goa Congress : काँग्रेस आमदारांनी घेतली हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांची भेट; 'या' विषयावर केली चर्चा

प्रदेश काँग्रेसला बळकटी देण्याच्या अनुषंगाने चर्चा
Goa Congress
Goa Congress Dainik Gomantak

Maragao News: गोव्यात खासगी दौऱ्यानिमित्त आलेले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खू यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा आणि एल्टन डिकॉस्ता यांनी दक्षिण गोव्यातील एका हॉटेलमध्ये भेट घेतली आणि गोव्यात काँग्रेसला बळकटी देण्याच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चाही केली.

Goa Congress
Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर पिस्तुलसह नैनितालच्या 22 वर्षीय युवतीला अटक

काही महिन्यांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळवले होते. त्यानंतर सुखविंदर सिंग सुख्खू यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्यात ते खासगी दौऱ्यावर आले आहेत.

मुख्यमंत्री सुख्खू यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्य‍ांच्याकडे पक्षबांधणीचा मोठा अनुभव आहे.

उत्तम प्रशासक म्हणून त्यांची पक्षात ओळख आहे. प्रदेश काँग्रेसला तळागाळातील जनतेपर्यंत नेऊन पक्षाला पुन्हा बलशाली बनवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्याच्या दृष्टीने आम्ही त्य‍ांच्याशी चर्चा केली, असे अमित पाटकर म्हणाले.

तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्या वारंवार बैठका घेण्यासह सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवून जनतेला न्याय मिळवून देण्याचा सल्ला सुख्खू यांनी बैठकीत आम्हाला दिला. तसेच प्रदेश काँग्रेसल‍‍ा गरज भासेल तेव्हा पूर्ण मदत करण्याची हमीही त्यांनी दिली.

- अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com