Colvale Jail
Colvale Jail Dainik Gomantak

कोलवाळ कारागृहातील कैद्याकडील मोबाईल काही सापडेना

कैदी विकट भगत वगळता कोलवाळ कारागृहात सापडले दोन मोबाईल

म्हापसा : ड्रग्स तस्करी प्रकरणात पोलिसांनी कोलवाळ तुरुंग प्रशासनाला कैदी विकट भगत हा वापरत असलेला मोबाईल फोन पुढील चौकशीसाठी शोधून द्यावा, अशी विनंती केली होती. कोलवाळ मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने तपास करून दोन मोबाईल संच जप्त केले आणि ते कोलवाळ पोलिसांच्या हवाली केले. मात्र, कारागृहातील कैदी विकट भगत याने कथित तस्करीसाठी वापरलेल्या फोनचा थांगपत्ता लागलेला नाही.

24 जून रोजी ड्रग्स तस्करीचा अयशस्वी प्रकार घडला होता. कारागृहातील आयआरबी पोलिसांनी संशयित जेलगार्ड सूरज गावडे यास ड्रग्ससह रंगेहाथ पकडले होते. त्याला अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून 52 हजारांचे 4 ग्रॅम कोकेन जप्त केले होता.

पोलिस चौकशीवेळी संशयित गार्ड सूरज याने हे ड्रग्स कैदी विकट भगत याला देण्यासाठी आणले होते आणि ते ड्रग्स आगोंद-काणकोण येथील ड्रग्स पेडलर योगेश पागी याने मला दिले होते, असे पोलिसांना सांगितले होते.

त्याच्या जबाबानुसार, पोलिसांनी योगेश पागी याला अटक केली. नंतर कैदी विकट भगत याला चौकशीसाठी कारागृह प्रशासनाकडून हस्तांतरित पद्धतीने घेऊन कोलवाळ पोलिसांनी त्याला अटक केली होती. कैदी विकट याने मला जेल गार्ड गावडे याच्याकडे कोकेन पाठवण्यासाठी कारागृहातून संपर्क साधला होता, अशी माहिती योगेश पागी याने दिली. कोलवाळ पोलिसांनी तुरुंग प्रशासनाला कैदी भगत हा वापरत असलेला मोबाईल फोन पुढील चौकशीसाठी शोधून द्यावा, अशी विनंती केली होती.

Colvale Jail
वीज बिल घोटाळा प्रकरण सुनावणीच्या वैधतेवर आता शनिवारी निकाल

कोलवाळ पोलिसांच्या विनंतीनुसार तुरुंग प्रशासनाने कारागृहात झडती घेतली. यावेळी तुरुंगात दोन मोबाईल फोन सापडले. ते त्यांनी जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, यातील सीमकार्डवरून ते दोन्ही फोन विकट भगत याचे नाहीत, असे स्पष्ट झाले. त्यामुळे विकटने या तस्करीसाठी वापरलेला फोन पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे हा मोबाईल मिळाल्यास तपासाला गती मिळू शकते. तशा आशयाचे विनंती पत्र तुरुंग प्रशासनाला पाठवण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com