सुशांत कुंकळयेकर
Goa Congress MLA Join Bjp बरोब्बर एक वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला मोठे भगदाड पाडून काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये विलीन झाले हाेते. त्यावेळी यापैकी ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत आणि आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपदे मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
सत्ताधारी झाल्याने कामे झटपट होतील, या अपेक्षेने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही उमेद संचारली होती. १४ सप्टेंबर रोजी या घटनेला वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, कुणालाही मंत्रिपदही मिळाले नाही आणि विकासकामे करण्यासाठी पक्ष बदलणाऱ्या या आमदारांच्या मतदारसंघांत विशेष विकासकामेही झालेली नाहीत.
सिक्वेरांचा फायदा काय? : क्लिओफात कुतिन्हो
जो मतदारसंघ कडवा भाजपविरोधी आहे, त्या नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची हाराकिरी का केली आणि त्यांना त्याचा काय फायदा झाला, हेच कळत नाही.
मात्र, आश्वासन मिळाल्याशिवाय कुणी पक्ष बदलत नाहीत. सिक्वेरांना काय आश्वासन दिले होते आणि ते पाळले की नाही हे कळत नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक ॲड. क्लिओफात कुतिन्हो आल्मेदा यांनी व्यक्त केली.
मी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मडगाव मतदारसंघात विकासकामे वाढणार आहेत. येत्या काही महिन्यांत अनेक प्रकल्प सुरू होणार आहेत. या राजकीय निर्णयामुळे माझ्याबाबतीत कुठलाही विपरित परिणाम झालेला नाही. माझी सगळी कामे पूर्ण होत आहेत.
- दिगंबर कामत, आमदार, मडगाव.
भाजपमध्ये प्रवेश केल्याची मला खंत वाटत नाही. माझ्या मतदारसंघात विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी ज्या ज्यावेळी मी मुख्यमंत्र्यांकडे विकासकामांविषयी शब्द टाकला, त्या त्यावेळी त्या शब्दाचा मान राखला गेला आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्याचे कारण नाही.
- आलेक्स सिक्वेरा, आमदार, नुवे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.