Luizin Falero: राजकारणात सक्रिय होण्याबाबत फालेरोंचे सूचक वक्तव्य, म्हणाले ''राजकारणी अखेरपर्यंत...''

Luizin Falero: सूचक इशारा : मात्र पुढील योजना अजून गुलदस्त्यातच
Luizin Falero
Luizin FaleroDainik Gomantak
Published on
Updated on

Luizin Falero येत्या लोकसभा निवडणुकीसाठी सध्या काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी नावेली येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी बोलताना भारतातील राजकारणी मरेपर्यंत राजकारणातून निवृत्त होत नाहीत असे सांगून आपणही सध्या तरी निवृत्त होणार नाही असे स्पष्ट केले आहे.

फालेरो यांच्या या वक्तव्याकडे सूचक इशारा म्हणून पाहिले जात आहे.

नावेली येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांच्या नियोजित स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाच्या पायाभरणी सोहळ्यावेळी पत्रकारांशी बोलताना फालेरो यांनी हे सूतोवाच केले.

तुम्ही राजकारणात पुन्हा सक्रिय होणार की निवृत्त होणार असे विचारले असता, भारतातील राजकारणी कधीच निवृत्त होत नाहीत, असे ते म्हणाले.

लुईझिन फालेरो यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लोकसभा उमेदवारीचे आश्वासन दिल्यामुळेच त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला अशी राजकीय वर्तुळात वदंता चालू असतानाच त्यांनी हे सूचक भाष्य केले आहे.

Luizin Falero
Goa Monsoon 2023: वादळसदृश्य कमी दाबाचा पट्टा सोलापूरकडे सरकला; धोका टळला, पण जनजीवन विस्कळीत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com