Goa Congress : काँग्रेसकडून‘जैत रथ’द्वारे प्रचाराला गती; अमित पाटकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

Goa Congress : पाटकर म्हणाले, ज्या लोकांना काँग्रेसला पाठिंबा द्यायचा आहे ते ९८२१८२१८९८ या नंबरवर ‘मिस्ड कॉल'' देऊ शकतात आणि तद्नंतर पक्षाचे सदस्य लोकांशी संपर्क साधतील. राज्यातील जनतेने काँग्रेसच्या दोन्ही निवडून देण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress :

पणजी, काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या ‘न्याय हमी’बद्दल लोकांना माहिती ‘जैत रथातून'' दिली जाणार आहे. त्याशिवाय मोबाईलवर ‘मिस्ड कॉल तथा हाथ देगा साथ, बदलेंगे हालात’ ही मोहीमही राबविली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

काँग्रेस भवनाबाहेर गुरुवारी या मोहिमेचा आणि रथाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप, मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर आदी उपस्थित होते.

पाटकर म्हणाले, ज्या लोकांना काँग्रेसला पाठिंबा द्यायचा आहे ते ९८२१८२१८९८ या नंबरवर ‘मिस्ड कॉल'' देऊ शकतात आणि तद्नंतर पक्षाचे सदस्य लोकांशी संपर्क साधतील. राज्यातील जनतेने काँग्रेसच्या दोन्ही निवडून देण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे.

ॲड. रमाकांत खलप आणि कॅप्टन विरियाटो फर्नांडिस या दोन्ही उमेदवारांना लोकांकडून उत्तम प्रतिसाद प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या ‘न्याय हमी’बद्दल लोकांना जागृत करण्यासाठी प्रचाराची वाहने सर्व विधानसभा मतदारसंघात फिरणार आहेत. राज्यातील बेरोजगारी आणि महागाईसारख्या समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे बदल घडवून आणण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांनी २०१४ मध्ये खाणी पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु डबल इंजिन सरकारला खाणी सुरू करण्यात अपयश आले.

Goa Congress
Goa Loksabha: संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य! काँग्रेसच्या विरियातोंची उमेदवारी बाद करण्याची भाजपची मागणी

कॉंग्रेसच्या प्रचाराला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात आहे. डबल इंजिन सरकार लोकांच्या बचत खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करण्यात अपयशी ठरले आहे. गोवा आणि येथील पर्यावरण वाचवण्यासाठी ‘इंडिया आघाडीत‘ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.

-युरी आलेमाव,

विरोधी पक्ष नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com