Goa Congress : तूरडाळ-साखर नासाडीची उच्चस्तरीय चौकशी करा!

संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची काँग्रेसची मागणी
Goa Congress President Amit Patkar
Goa Congress President Amit PatkarDainik Gomantak

Goa Congress : म्हादई नदीवरील बंधाऱ्याच्या बेकायदेशीर बांधकामाची राज्यपालांनी स्वतः पाहणी करावी, त्याचबरोबर तूरडाळ-साखरेच्या नासाडीबाबत जबाबदार तत्कालीन नागरी पुरवठा मंत्री, अधिकाऱ्यांना बडतर्फ करा. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी. राज्यातील वाढत्या बेरोजगारीविषयी श्‍वेतपत्रिका काढण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशा तीन प्रमुख मागण्यांचे निवेदन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व पाच आमदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सादर केले.

याप्रसंगी उपाध्यक्ष एम. के. शेख, कार्याध्यक्ष आमदार युरी आलेमाव, आमदार संकल्प आमोणकर, मुख्य प्रतोद ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता आणि आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांची उपस्थिती होती. निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटकर म्हणाले की, कर्नाटकने म्हादई खोऱ्यातील पाणी वळवण्यासाठी बंधाऱ्यांचे काम सुरू केले आहे. कर्नाटकच्या या कामाची राज्यपालांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत पाहणी करावी. यात राजकीय पक्ष तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनाही सामावून घ्यावे.

Goa Congress President Amit Patkar
Goa Panchayat Election : डिचोलीत मतदारांची मतदानाकडे पाठ; उमेदवार चिंतेत

राज्यातील बेरोजगारीची टक्केवारी ही चिंतेची बाब आहे. केवळ निवडणुका आल्यानंतर सरकारी नोकरीचे आश्‍वासन भाजपकडून दिले जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करणारी विधाने पाहता ही चिंतेची बाब आहे, असे पाटकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com